उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे देवगड येथे ग्रंथप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे
देवगड येथे ग्रंथप्रदर्शन
उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे देवगड येथे ग्रंथप्रदर्शन

उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे देवगड येथे ग्रंथप्रदर्शन

sakal_logo
By

98550
देवगड ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शनावेळी उपस्थित मान्यवर.

उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे
देवगड येथे ग्रंथप्रदर्शन
देवगड, ता. २५ ः येथील उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन पार पडले. प्रदर्शनाचे उद्‍घाटन शेठ म. ग. हायस्कूलमधील शिक्षक प्रवीण खडपकर यांच्या हस्ते करण्यात आले. पुस्तके ही जगण्याची अनुभुती देतात, असे मत श्री. खडपकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी श्री. खडपकर म्हणाले, ‘‘विख्यात साहित्यिक विल्यम शेक्सपियरचा स्मृतीदिन म्हणून ‘जागतिक पुस्तक दिन’ साजरा केला जातो. या दिनानिमित्त जगातील सर्व नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यात येते. पुस्तके ही जगण्याची अनुभूती देतात. पुस्तकांमुळे अनेक विचारवंतांना प्रेरणा मिळाली आहे. लेखकाने लिहिलेल्या पुस्तकाचे विविध भाषांमधून अनुवाद होत असतात. त्यामुळे साहित्याच्या कक्षा रुंदावतात आणि लेखन कला विकसित होते. समाज वाचनाभिमुख करण्यासाठी ग्रंथालयांनी जास्तीत जास्त वाचक चळवळ वृद्धिंगत करावी.’’ ग्रंथालयाचे संचालक सदस्य सीताराम पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष सागर कर्णिक, सचिव संजय धुरी, सचालक सदस्य दत्तात्रय जोशी उपस्थित होते. श्री. कर्णिक यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. ग्रंथालयाच्या सर्व वाचकांनी या ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ग्रंथालयाचे वाचक उपस्थित होते. हे ग्रंथप्रदर्शन शनिवारपर्यंत (ता. २९) सर्वांसाठी खुले राहणार आहे.