महाविकास आघाडीविरोधात कुडाळात भाजपची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविकास आघाडीविरोधात
कुडाळात भाजपची निदर्शने
महाविकास आघाडीविरोधात कुडाळात भाजपची निदर्शने

महाविकास आघाडीविरोधात कुडाळात भाजपची निदर्शने

sakal_logo
By

98592
कुडाळ ः नगरपंचायतीच्या पायऱ्यांवर बसून महाविकास आघाडीविरोधात निदर्शने करताना भाजपचे नगरसेवक.

महाविकास आघाडीविरोधात
कुडाळात भाजपची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः ‘खाली मुंडी पाताळ धुंडी, २७ लाखाची घसरगुंडी’, ‘दोन खोके एकदम ओके’, ‘कुत्र्यांच्या नसबंदी मोहिमेत घोटाळा करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध असो’, अशा घोषणा देत भाजपच्या नगरसेवकांनी येथील नगरपंचायतीच्या पायऱ्यांवर बसून महाविकास आघाडीविरोधात निदर्शने केली.
येथील नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज नगरपंचायत कार्यालयात झाली. या सभेपूर्वी भाजपच्या नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. यामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बालोद्यानासह भटक्या कुत्र्यांची नसबंदी, बहिवक्र आरसे यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कारभाराचा निषेध भाजपच्या नगरसेवकांनी घोषणा देऊन केला. यावेळी भाजपचे गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका संध्या तेरसे, अभिषेक गावडे, नीलेश परब, चांदणी कांबळी, नयना मांजरेकर उपस्थित होते.