देवगड येथे एकाची
गळफासाने आत्महत्या

देवगड येथे एकाची गळफासाने आत्महत्या

झाडाला गळफास स्थितीत
देवगडात एकाचा मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ ः येथील पवनचक्की-साटमवाडी भागात राहणाऱ्या एकाचा परिसरातीलच झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळला. प्रकाश आत्माराम साटम (वय ५५), असे त्यांचे नाव आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास निदर्शनास आली. साटम यांनी आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवनचक्की-साटमवाडी परिसरातील एका झाडाला साटम यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. याबाबत आनंद आत्माराम साटम (वय ६०) यांनी येथील पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिली. अधिक तपास देवगड पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com