१६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
१६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

१६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

sakal_logo
By

98599
कणकवली : शहरात कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या ठेवणाऱ्या विक्रेत्‍यांवर नगरपंचायत पथकाने आज कारवाई केली.

१६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

कणकवलीत कारवाई; विक्रेत्यांना नगरपंचायतीकडून दंड

कणकवली, ता.२५ : बंदी असणाऱ्या कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या विक्रेत्‍यांवर आज नगरपंचायतीने कारवाई केली. नगरपंचायतीने राबविलेल्‍या या मोहिमेत १० विक्रेत्‍यांकडून १६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तसेच चार हजार शंभर रूपये दंड करण्यात आला.
राज्‍यशासनाने १२० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली आहे. तर शहरात २० ते ५० मायक्रॉन पर्यंतच्या प्लास्टिक पिशव्या अनेक विक्रेत्‍यांनी ठेवल्या होत्‍या. या पिशव्यांमधून ग्राहकांना साहित्‍य दिले जात होते. त्‍याअनुषंगाने गेल्‍या आठवड्यात नगरपंचायतीने १०० पेक्षा कमी मायक्रॉन जाडीच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला होता; मात्र या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या बाळगणाऱ्या दहा विक्रेत्‍यांवर नगरपंचायतीने आज दंडात्मक कारवाई केली. तसेच त्‍यांच्याकडील पिशव्या देखील जप्त करण्यात आल्‍या. आजच्या आठवडा बाजारात आलेल्या विविध विक्रेत्यांकडून पिशव्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत नगरपंचायत चे स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, नगरपंचायत कर्मचारी प्रवीण गायकवाड, सतीश कांबळे, पूजा तांबे, रमेश तांबे आदींनी सहभाग घेतला. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी तावडे यांनी दिला.