दापोलीत आज व्हिजन दापोली 4 परीक्षा

दापोलीत आज व्हिजन दापोली 4 परीक्षा

व्हिजन दापोली
शिष्यवृत्ती परीक्षा
गावतळे ः दापोली तालुका शिक्षण विभागामार्फत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन केले असून गुरुवारी (ता. २७)
या परीक्षेला २६ केंद्रातून ९९६ विद्यार्थी व्हीडीएस ४ ला सामोरे जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी परीक्षापूर्व सभेत सांगितले. परीक्षा परिषदेच्या धर्तीवर पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा गेले दोन वर्षे व्हिजन दापोली अंतर्गत घेतली जाते. वस्तुनिष्ठ परीक्षा संपन्न व्हावी या उद्देशाने प्रश्नपत्रिकेची निर्मिती ते निकालापर्यंत पूर्ण गोपनियता ठेवली जात असून दरवर्षी किमान १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवडलेल्या १०० विद्यार्थी म्हणजे जणू अर्कच असतो. सदर विद्यार्थ्यांसाठी पाचवीमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. व्हिजन दापोलीचे सचिव सुनील कारखेलेंचे नेटके नियोजन हे वैशिष्ट्यपूर्ण असून सदर परीक्षा सुरळीत पार पडेल अशी आशाही बळवंतराव यांनी व्यक्त केली.
-------------
तुकडी वाढीसाठी
अर्जाचे आवाहन
रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरू करण्यासाठी इच्छुक पंजीकृत संस्थांकडून/व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थांकडून अर्ज मागविण्याबाबतची जाहिरात मंडळाचे संकेतस्थळ www.msbsde.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रवेश सत्र २०२३ -२४ पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाविणाऱ्या नवीन संस्थांना व अस्तित्वात असलेल्या संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवाढ सुरू करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छुक संस्थांनी मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन प्रस्ताव सादर करावा. तसेच संबधित जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे प्रस्तावाच्या ४ प्रती ३० एप्रिलपूर्वी सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, असे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी कळवले आहे.
-------------
लोकशाही दिन
२ मे रोजी
रत्नागिरीः जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. मे २०२३ मधील पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने मे २०२३ चा लोकशाही दिन २ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे. लोकशाही दिनाकरिता नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com