
पाणी नमुना तपासणी महिलांकडून गावातच
rat26p5.jpg
98700
राजापूरः कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना प्रभारी गटविकास अधिकारी सुहास पंडित.
rat26p6.jpg
98701
राजापूरः जलप्रतिज्ञा घेताना सहभागी सदस्य, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षारक्षक.
------------
गावातच महिलांकडून पाणी तपासणी
सुहास पंडित ; जलजीवन मिशन लोकसहभागातून यशस्वी करा
राजापूर, ता. २६ः जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची गुणवत्ता महत्त्वाची असून जैविक व रासायनिक पाणी नमुना तपासणी महिलांच्या माध्यमातून गावातच केली जाणार आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी केले. लोकसहभाग वाढवून तालुक्यामध्ये जलजीवन मिशन योजना यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
तालुक्यातील ओणी येथील गजानन मंगल कार्यालयामध्ये जलजीवन मिशन योजनेची कार्यशाळा झाली. या वेळी विस्तार अधिकारी श्री. नाटेकर, सरपंच, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक व ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती सदस्य आदी उपस्थित होते. जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील विविध भागधारकांचा योजनेचे नियोजन, अंमलबजावणी व देखभाल-दुरुस्ती टप्प्यावर सहभाग वाढवा, गावस्तरावर पाण्याचे सुयोग्य नियोजन व्हावे आदी उद्देशाने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. दोन दिवस झालेल्या या कार्यशाळेमध्ये नळपाणी योजना आणि पाणीपुरवठा योजनांची देखभाल-दुरुस्ती व हस्तांतरण प्रक्रिया, पाईपचे प्रकार व फिटींग, पाण्याची सुरक्षितता व शाश्वतता, ग्रामीण पाणी पुरवठा समितीच्या जबाबदारी व कर्तव्य, पाणी गुणवत्ता व त्यांचे महत्त्व विविध तपासणी व त्यांचे प्रात्यक्षिक, पंपाचे प्रकार व प्रतिबंधात्मक उपाययोजना आदींच्या अनुषंगाने तज्ञांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी श्री. पंडित यांनी प्रशिक्षणार्थीना जल प्रतिज्ञेनेची शपथ दिली.
-----------
चौकट
तपासणीसाठी महिलांना प्रशिक्षण
महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून पाण्याची जैविक आणि रासायनिक दोन्ही प्रकारची तपासणी होणार. त्यामध्ये तपासणी करण्यासाठी कीट महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे वर्षातून दोन किंवा तीनवेळा तपासणी होईल, अशी माहिती प्रभारी गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी सांगितले.