दाभोळ-संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा
दाभोळ-संक्षिप्त पट्टा

दाभोळ-संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

टुडे पान ४ साठी, संक्षिप्त)

९८७१३
कोळथरेतील रस्ता कामाचे भूमिपूजन
दाभोळ ः भाजपाच्या विधान परिषदेतील सदस्य आमदार उमा खापरे यांच्या कोळथरे दौऱ्यात रस्ता कामांचे भूमिपूजन करण्यात आले. कोळथरे गावातील कुंभारवाडी, आडविलकर वाडी आणि वरची भंडारवाडी भागातील वर्दळीचे असणारे मुख्य रस्ते अनेक वर्ष प्रलंबित होते. या तीन रस्त्यांसाठी आमदार उमा खापरे यांच्या स्थानिक विकास निधीतून ३० लाख मंजूर केले. या कामांची वर्कऑर्डरही ठेकेदाराला दिली. कामाचे भूमिपूजन केले. कोळथरे, पंचनदी, चिखलगाव आणि देवके या भागात मिहीर महाजन यांनी विशेष पाठपुरावा करून विविध योजनांमध्ये विकासकामांचा समावेश करून घेतला आहे. एकाच वर्षात आमदार खापरे यांच्या शिफारशीने एकूण १ कोटीच्या निधीची विकासकामे या जिल्हा परिषद गटात शासनाकडून मंजूर करून आणल्याचे मिहीर महाजन यांनी सांगितले. कोळथरे येथे बसस्थानक आणि वरचा भंडारवाडा येथे दोन भूमिपूजनाचे कार्यक्रम झाले. कोळथरेच्या उपसरपंच अंतरा झगडे, सदस्य शैलेश संकुळकर, ज्योती महाजन, अंजनी संकुलकर, पंचनदीचे उपसरपंच अमित नाचरे, सदस्य सुदर्शन जाधव, उसगाव सदस्य गायत्री वैद्य आदी उपस्थित होते.

दापोली अर्बन महाविद्यालयात २९ ला पदवीदान
दाभोळ ः दापोली शिक्षण संस्था संचलित दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये पदवी अथवा पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ २९ एप्रिलला महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आला आहे. कार्यक्रमाला लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी विश्वनाथ काळे यांचे हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. संदेश जगदाळे यांनी केले आहे.

९८७१२
दापोलीत मल्लखांब प्रशिक्षण केंद्र
दाभोळ ः दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनच्या नियमित मल्लखांब प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ नुकताच दापोली अर्बन बँक सिनिअर सायन्स कॉलेज येथे संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी लाठीकाठी, मगदुल, दोरीचा मल्लखांब, लाकडाचा मल्लखांब आदींची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. आठवड्यातून ५ दिवस मल्लखांब, लाठीकाठी व मगदुलचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष मनोज पवार, नगराध्यक्ष ममता मोरे, डॉ. प्रभाकर शिंदे, सुदेश मालवणकर, अजित सुर्वे, गजानन बेलोसे, मर्दानी खेळ असोसिएशन रत्नागिरीचे सचिव राजेंद्र बटावले, अॅड. सुशांत बेलोसे, नगरसेविका रिया सावंत आदी उपस्थित होते.