दशावतार कलावंतांचा मळगाव येथे सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दशावतार कलावंतांचा 
मळगाव येथे सन्मान
दशावतार कलावंतांचा मळगाव येथे सन्मान

दशावतार कलावंतांचा मळगाव येथे सन्मान

sakal_logo
By

98719
मळगाव ः तेलकाटावाडी येथे सत्कार सोहळ्यावेळी राजेंद्र परब, स्नेहल जामदार, हनुमंत पेडणेकर, नीलेश कुडव, गुरुनाथ गावकर, प्रेमनाथ राऊळ, नंदकिशोर मुळीक, अॅड. अंकुश ठाकूर, सुखदेव राऊळ आदी.

दशावतार कलावंतांचा
मळगाव येथे सन्मान

सुयोग कलामंचचा पुढाकार

सावंतवाडी, ता. २६ ः मळगाव-तेलकाटावाडी येथे आयोजित वार्षिक नाट्यप्रयोगाच्या निमित्ताने सुयोग कलामंचतर्फे ज्येष्ठ दशावतार कलाकारांचा सत्कार करण्यात आला. मंडळाच्या रंगमंचावर हा सोहळा झाला.
व्यासपीठावर माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब, सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच नीलेश कुडव, गुरुनाथ गावकर, पंच सदस्य प्रेमनाथ राऊळ, मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मुळीक, अॅड. अंकुश ठाकूर, विश्वनाथ गोसावी, महेश गवंडे, सत्कारमूर्ती गजानन लातये, संतोष गावडे, गंगाराम राऊळ, बाबल नाईक, आनंद राऊळ, पत्रकार सुखदेव राऊळ आदी उपस्थित होते. दशावतारातील ज्येष्ठ कलावंत (कै.) सखाराम उर्फ बाबी लातये यांच्यावतीने त्यांचे सुपुत्र गजानन लातये यांनी माजी सभापती परब यांच्या हस्ते, (कै.) बाळकृष्ण गावडे यांचा सत्कार त्यांचे सुपुत्र संतोष गावडे यांनी माजी सरपंच कुडव यांच्या हस्ते स्वीकारला. गुरुवर्य बाबल नाईक यांचा सत्कार उपसरपंच हनुमंत पेडणेकर, गंगाराम राऊळ यांचा सत्कार गुरुनाथ गावकर, मंडळाचे अध्यक्ष मुळीक यांचा सत्कार विजय खानोलकर, गणेशतळीसाठी जमीन दिल्याबद्दल आनंद राऊळ यांचा सत्कार अॅड. ठाकूर, मोरेश्वर दशावतार मंडळाचे मालक यांचा सत्कार सरपंच जामदार यांनी केला. मोरेश्वर दशावतार मंडळाचा ‘अकल्पासुर वध’ नाट्यप्रयोग झाला. तुषार वालावलकर यांनी आभार मानले.