संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

पान २ साठी, संक्षिप्त


लोटे नर्सिंग महाविद्यालयात रक्तदान
खेड ः लोटे-घाणेखुंट एम.ई.एस. कॉलेज ऑफ नर्सिंगच्या राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ लोटेच्या सहकार्याने आयोजित शिबिरात ३७ जणांनी रक्तदान केले. याप्रसंगी एमईएस आयएचएसचे संचालक व एमईएस आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शामसुंदर भाकरे, एमईएस कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रा. मिलिंद काळे, एमईएस परशुराम हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अनुपम अलमान, आरएमओ डॉ. मच्छिंद्र गोवळकर, इंटरनीज, बी.के.एल. वालावलकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. रवी. अगरवाल, घाणेखुंटचे सरपंच संतोष ठसाळे, रोटरॅक्ट क्लब ऑफ लोटेचे अध्यक्ष मकरंद सोलकर, तुषार खताते, सहाय्यक गव्हर्नर पद्माकर सुतार आदी उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या शिबिरातील रक्त संकलनासाठी वालावलकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या रक्तपेढी टीमने मोलाचे सहकार्य केले.

क्रिकेट स्पर्धेत निवे-शिवशंभो संघ विजेता
खेड ः तालुक्यातील साखर-जांभुळवाडी जय हनुमान विकास मंडळाच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेत निवेतील शिवशंभो संघाने विजेतेपद पटकावले. धामणंद-वगळाचा माळ।संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत साखर-बामणवाडी संघाने तृतीय तर मुसाड-चांदेवाडी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना रोख पारितोषिक व चषक देवून गौरवण्यात आले. शिस्तबद्ध संघ म्हणून पोसरेच्या जय गणेश‌ संघाची निवड करण्यात आली. वैभव आदवडे- उत्कृष्ट फलंदाज, वैभव जाधव- उत्कृष्ट गोलंदाज, तर विशाल उतेकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला. या खेळाडूंना रोख पारितोषिक व चषक देऊन गौरवण्यात आले.

दयाळ येथे ओवर आर्म क्रिकेट स्पर्धा
खेड ः तालुक्यातील दयाळ येथील नवतरुण मित्रमंडळातर्फे ३० एप्रिल आणि १ मे रोजी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष दत्ताराम महाडिक यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महेश वाडेकर, दिनेश महाडिक यांच्याशी संपर्क साधावा.