
रोहिदास हांगे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
ratchl261.jpg-
98737
रत्नागिरीः पालकमंत्र्याकडून पुरस्कार स्वीकारताना ग्रामसेवक रोहिदास हांगे.
----------
रोहिदास हांगे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
चिपळूण, ता. २६ः तालुक्यातील खडपोली आणि नांदिवसे ग्रामपंचायतीमध्ये २०१८-१९ वर्षापासून कार्यरत असलेले ग्रामसेवक संघटनेचे सचिव रोहिदास हांगे यांना उत्कृष्ट व लोकाभिमुख प्रशासकीय सेवेसाठी चिपळूण तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोविड कालावधीत त्यांनी लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले कोविड सेंटर सुरू केले होते.
रत्नागिरीत झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ग्रामसेवक रोहिदास हांगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बीड या मूळगावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्री. हांगे यांनी स्पर्धा परीक्षेतून स्थानिक स्वराज्य संस्थेत सेवा करण्याचा पर्याय निवडला. २०१२ साली त्यांनी चिपळूण तालुक्यातील ताम्हणमळा व नारदखेरकी ग्रामपंचायतीत सचिव म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीत नारदखेरकी ग्रामपंचायतीला सलग पाच वर्षे संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार प्राप्त झाला. २०१८-१९ पासून ते तालुक्यातील खडपोली या गावात सेवा बजावत आहेत. याच कालावधीत उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
श्री. हांगे चिपळूण तालुका ग्रामपंचायत संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत असून ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी देखील त्यांचे योगदान आहे.
-----------
कोट
कोविड काळात लोकसहभागातून जिल्ह्यातील पाहिले कोविड सेंटर सुरू करण्यासाठी खडपोली सरपंच नेहा खेराडे, सर्व सदस्य व ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रामसेवक हांगे यांनीही याकामी विशेष योगदान दिले. सर्वांना विश्वासात घेऊन पारदर्शक कारभार करण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना हे यश मिळाले असून खडपोली ग्रामस्थांकडून श्री. हांगे यांचे विशेष अभिनंदन.
- तुषार शिंदे, ग्रामस्थ, खडपोली.