जिल्ह्यातील आदिवासींची अजूनही पाण्यासाठी वणवण

जिल्ह्यातील आदिवासींची अजूनही पाण्यासाठी वणवण

आदिवासींची अजूनही पाण्यासाठी वणवण
जलजीवन मिशन प्रभावीपणे राबवावी; मनमानीला हवा चाप
दाभोळ, ता. २६ : रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन प्रभावीपणे राबविण्यात यावे. या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना अजूनही पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गरीब व आदिवासीपर्यंत पाणी पोचवा, अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
हर घर जल या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गांवातील प्रत्येक घरात, शाळा व गावातील सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कामांना सुरुवातही झाली आहे. परंतु अनेक तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामावरून न तालुकास्तरीय सभेत मोठा गदारोळ होत आहेत. भांडणाच्या तक्रारी पोलिस ठाण्यापर्यंत जात आहेत. या तक्रारींचा सर्वे न करता कुठेही मनमानी काम करणे, एका गावात एकाच ठिकाणी २०० फूट बोअर केले जाते, तर दुसऱ्या गांवात ३०० फूट बोअर केली जाते. गावात दोन टाक्या असताना फक्त एकच टाकी बसवणे, एक वर्षही टिकणार नाही अशा निष्कृष्ट दर्जाचे नळ, पाईप व इतर साहित्य वापरण्यात येत आहेत. तसेच ठराविक प्रभागात कामे केली जात आहेत.
या अगोदरही जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण, बांधकाम, घरकुल व विविध कल्याणकारी योजनेत बोगस व कामे न करता परस्पर अनुदान, निधी हडप केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यासाठी संबंधित यंत्रणेला पारदर्शक व चांगल्या प्रतीची कामे करण्यासाठी सूचित करण्यात यावे. कल्याणकारी योजना गरीबांपर्यंत प्रभावीपणे राबविल्या गेल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जलजीवन मिशन योजने अंतर्गत गरीबांपर्यंत पाणी पोहचले पाहिजे, म्हणून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्सने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com