मोबाईल चोरीतील संशयित सापडला

मोबाईल चोरीतील संशयित सापडला

मोबाईल चोरीतील संशयित सापडला
कणकवली ः येथील एसटी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना दहा हजाराचा मोबाईल चोरीस गेला होता. या प्रकरणी राजापूर येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. तर त्याच्या दुसऱ्या साथिदाराच्या शोधात पोलिस आहेत. आज सायंकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले असून तो मुळ आंद्रप्रदेशातील आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. चोरीची ही घटना २१ एप्रिलला सकाळी आठच्या सुमारास कणकवली एसटी बस आगारात घडली होती. भाऊसाहेब रामचंद्र कापसे (रा. कणकवली) यांनी येथील पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. श्री. कापसे हे साळिस्ते येथे जात होते. येथील बसस्थानकात वेंगुर्ला-रत्नागिरी बसमध्ये चढत असताना त्यांच्या खिशातील मोबाईल चोरीला गेला होता. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला होता. स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संशयिताला उद्या (ता. २७ ) अटक करून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
-----------------------
दागिने चोरीतील संशयिताच माग
कणकवली ः येथील बसस्थानकात कणकवली - लातूर एसटीमध्ये चढत असताना अज्ञाताने महिलेच्या पर्समधील २१ तोळ्याचे सोन्याचे दागिणे पळविले होते. या चोरीतील संशयितापर्यंत पोलिस पथक पोहचले असून त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. चोरीची ही घटना १७ एप्रिलला दुपारी साडेबाराच्या सुमारास येथील बसस्थानकात घडली होती. याबाबत संचिता सूर्यकांत कदम (वय ५८, मूळ रा. कुर्ली, ता. वैभववाडी, सध्या रा. सांताक्रुज- मुंबई) यांनी फिर्याद दाखल केली होती. या तपासात स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यावरून पोलिसांनी संशयिताचा माग काढल्याचे सूत्रांनी सांगितले.
----
तेलीवाडीत एकाची आत्महत्या
कणकवली ः बोर्डवे-तेलीवाडी येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. बोर्डवे-तेलीवाडी येथील दीपक लक्ष्मण बोर्डवेकर (वय ५७), असे त्याचे नाव आहे. त्यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली, हे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. घराच्या मागील बाजूच्या विहिरीच्या रहाटाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे मंगळवारी सायंकाळी निदर्शनास आले. या बाबतची खबर मृताची पत्नी ज्योती यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com