ज्येष्ठ रंगकर्मींनी प्रयत्न करावा

ज्येष्ठ रंगकर्मींनी प्रयत्न करावा

१८ (टूडे पान ३ साठी, अॅंकर)

- rat२७p५.jpg ः
९८८८०
खेड ः मास्तरांची प्रयोगशाळा शिबिराच्या सांगता समारंभाला उपस्थित अभिनेते अभय खडपकर यांच्यासह शिबिरातील मार्गदर्शक.
-----

सुप्तगुणांना वाव देण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्मींनी प्रयत्न करावा

अभिनेते अभय खडपकर ः मास्तरांची प्रयोगशाळा शिबिराची सांगता

रत्नागिरी, ता. २७ः नवीन पिढीत नाटक रूजवण्यासाठी ‘मास्तरांची प्रयोगशाळा’ उपक्रमाची सध्या आवश्यकता आहे. येथील ज्येष्ठ रंगकर्मी यांनीही या मुलांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत मालिका, चित्रपट अभिनेते अभय खडपकर यांनी व्यक्त केले.
शहरातील नरहर वसाहत येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित ‘मास्तरांची प्रयोगशाळा’ शिबिरात ते बोलत होते. नाट्य चळवळीला चालना देण्यासाठी आणि बालवर्गापासून मोठ्यांपर्यंत नाटकाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने रंगमंचावरील गंमतजंमत शिबिर घेण्यात आले. याची सांगता रंगकर्मींच्या खुल्या चर्चासत्राने झाली. शेवटच्या सत्राला अभिनेते खडपकर उपस्थित होते. या वेळी रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी नितीन जोशी, लेखक अमेय धोपटकर, संगीततज्ज्ञ विजय रानडे, मोहन बापट, अण्णा वायंगणकर, मालिका अभिनेते प्रफुल्ल घाग, शेखर मुळ्ये, दीपेश काळे यांच्यासह अनेक रंगकर्मी उपस्थित होते.
या शिबिराला ३५ विद्यार्थी सहभागी झाले होते. पाच दिवसीय शिबिरात प्रार्थना, खेळ, गाणी, रंगमंचीय हालचाली, प्रसंगनाट्य, वाचिक अभिनय, रंगभूषेचे पैलू, अभिनयाचे धडे नऊ ते सोळा वर्षांच्या मुलांना देण्यात आले. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ नाटक, मालिका आणि चित्रपट अभिनेते अभय खडपकर यांनी काम पाहिले. त्यासह येथील रंगकर्मी नेपथ्यकार प्रशांत साखळकर, मोहन बापट, अमेय धोपटकर, रंगभूषाकार नरेश पांचाळ, दीपक माणगांवकर, दीपेश काळे, सौरभ तारवे, साक्षी कोतवडेकर, राधा टिकेकर, संदीप विरकर, सचिन काळे आदींनी मेहनत घेतली. शिबिरात विद्यार्थ्यांकडून एक बालनाट्य बसवून घेण्यात आले. त्याचे सादरीकरण सांगता समारंभाला झाले.

-----
चौकट

रंगकर्मींच्या समस्यांवर चर्चा

नाट्यकला हा तर कोकणी माणसाचा प्राण. कोकणातील नाट्यचळवळ ही एक सशक्त चळवळ आहे; पण नाट्यकला जपताना कोकणातील रंगकर्मींना अनेक प्रश्न भेडसावतात. अनेक अडचणींचा सामना करावा लागतो यावर चर्चा करावी, त्या समस्या समजून घ्याव्यात आणि काही मार्ग काढावा याच उद्देशाने ‘मास्तरांची प्रयोगशाळा’ तर्फे कोकणातील नाट्यचळवळ आणि रंगकर्मींच्या समस्या या विषयावर एक खुले चर्चासत्र आयोजकांतर्फे घेण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com