चिपळुणात भाज्यांचा दर 5 ते 10 रुपयांनी वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात भाज्यांचा दर 5 ते 10 रुपयांनी वाढले
चिपळुणात भाज्यांचा दर 5 ते 10 रुपयांनी वाढले

चिपळुणात भाज्यांचा दर 5 ते 10 रुपयांनी वाढले

sakal_logo
By

१४ (टुडे ३ साठी)

चिपळूणमध्ये भाज्यांच्या दरात वाढ

उन्हाचा चटका ः खर्चाचा ताळमेळ बसवताना कसरत

चिपळूण, ता. २७ ः कडाक्याच्या उन्हाचा तडाखा भाजीपाल्यावर झाला असून बाजारातील आवक घटली आहे. बाजारात येत असलेली भाजी कमी असल्यामुळे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींना खर्चाचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागत आहे. वाढत्या तापमानाचे चटके भाज्यांच्या उत्पादनाला आणि पर्यायाने ग्राहकांना बसत आहेत. चिपळूणच्या बाजारात होणारा भाज्यांचा पुरवठा घटल्याने सर्वच भाज्यांचे किरकोळ बाजारातील दर किलोमागे ५ ते १० रुपयांनी वाढले आहेत.
एप्रिल महिना अवकाळी पाऊस आणि कडाक्याचे उन्ह असा संमिश्री गेला आहे. उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम भाजीपाला लागवडीवरही होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रातून येते. स्थिनिकस्तरावर होणारी लागवड पूरेशी नाही. उन्हाचे चटके वाढू लागल्याने उत्पादन कमी होत आहे. पाणी कमी होत असल्याने अनेक बचतगटांकडील भाजी कमी झाली आहे. मेथी, कोथिंबीरसह फळ भाज्यांच्या आवकेत मोठी घट झाली आहे. त्यामुळे मेथीच्या जुडीसाठी तीस ते चाळीस रुपये मोजावे लागत होते. गेल्या आठवड्यात किरकोळ बाजारात मेथीची पेंढी ५ ते १० रुपयाला विकली जात होती. मार्चअखेरीस आल्याचा हंगाम संपतो. त्यामुळे नव्या आल्याची आवक सध्या सुरू झालेली नाही. त्यामुळे आलेही १२० रुपये किलोवर गेले आहे. गेल्या महिन्यात लिंबूचे दर दीडशे रुपये किलो होते. तशातच नवा बहर आल्याने आणि ढगाळ वातावरणासह वादळ व अवकाळीचा फटका बसताच लिंबांची मोठ्या प्रमाणावर आवक वाढली. परिणामी, २० रुपयांना तीन मिळणारे लिंबू आता १० ला दोन मिळत आहेत.

----
कोट

उन्हाच्या तीव्रतेचा परिणाम भाजीपाल्यावरही होऊ लागला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. पुढील काही दिवस दरवाढ कायम राहणार आहे. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील बाजार आणि वाशी मार्केटमधून भाज्या आणतो. तेथेही होलसेल दरात भाज्यांची दरबार झालेली आहे. त्यामुळे भाज्या जास्त किमतीत विकाव्या लागत आहेत.

- मंदार कांबळी, भाजी विक्रेता चिपळूण