वाफोलीत मेमध्ये धार्मिक कार्यक्रम

वाफोलीत मेमध्ये धार्मिक कार्यक्रम

swt२७२.jpg
९८८९५
श्री देवी माऊली मंदिर.

वाफोलीत श्री देवी माऊली
मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम
बांदाः वाफोली येथील श्री देवी माऊली पंचायतन कलशारोहण वर्धापन दिनानिमित्त सग्रह श्री सुक्त विधान, श्रींची महापूजा, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ५ मे रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ८ वाजता गणपतीपूजन, प्रायश्चित विधी, देवतांना नारळ विडे, पुण्याहवाचन, प्रधान देवता स्थापन पूजन, श्रीसुक्त जपाभिषेक, देवता होमहवन, कुमारिका पूजन, बलिदान, पूर्णाहुती, श्रींची महापूजा, दुपारी २ वाजता महानैवेद्य, महाआरती, देवता प्रार्थना, आशीर्वाद, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता ग्रामस्थांची सुश्राव्य भजने व रात्री १० वाजता श्री हेळेकर दशावतार नाट्यमंडळ, कारीवडे यांचा ''कालचक्र'' हा दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली पंचायतन स्थानिक सल्लागार उपसमिती, वाफोलीचे अध्यक्ष विलास गवस, प्रमुख मानकरी, वाफोली हितवर्धक ग्रामस्थ संस्था, मुंबई व वाफोली ग्रामस्थ यांनी केले आहे.
..................
''शामराव पेजे''तर्फे लाभार्थींना आवाहन
सिंधुदुर्गनगरीः ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (OTS) योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि. सिंधुदूर्ग यांच्यामार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात आले आहे. त्यानुसार महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com