कास शाळा नं. 1 ला संगणक संच, प्रिंटर

कास शाळा नं. 1 ला संगणक संच, प्रिंटर

swt२७३.jpg
९८८९८
कासः येथे संगणक व प्रिंटर शाळेला प्रदान करताना सुभाष पंडित. सोबत प्रवीण पंडित व मान्यवर.

कास शाळा नं. १ ला
संगणक संच, प्रिंटर
बांदाः ग्रामीण भागातील मुख्यत्वे शेतकरी वर्गातील मुलांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. डिजिटल काळात आपला पाया भक्कम असल्यास भविष्यात मुलांना संगणक विषय प्रश्न निर्माण होणार नाही. विद्यार्थ्यांनी याचा उपयोग परिपूर्ण शिक्षणासाठी करावा, असे आवाहन माजी विद्यार्थी सुभाष पंडित यांनी केले. जिल्हा परिषद कास शाळा नंबर १ या शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या मुंबई येथे कार्यरत असलेले पंडित यांनी शाळेची गरज ओळखून तीन संगणक संच आणि प्रिंटर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मिळवून दिले. संगणक व प्रिंटर शाळेला नुकताच प्रदान करण्यात आले. कास सरपंच प्रवीण पंडित, उपसरपंच गजानन पंडित, काशिनाथ पंडित, रमेश पंडित, पांडुरंग पंडित, श्रीकांत पंडित, मुख्याध्यापिका नाईक, शिक्षक स्वाती पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. सुभाष पंडित यांनी शाळेला संगणक मिळवून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
...............
swt२७४.jpg
98899
श्री संत सोहिरोबानाथ

इन्सुलीत आत्मसाक्षात्कार दिन
बांदाः इन्सुली-डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ मंदिर येथे श्री संत सोहिरोबनाथ आत्मसाक्षात्कार दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ५ मे रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी ६ वाजता काकड आरती, सकाळी ८.३० वाजता श्रींच्या पादुकांवर अभिषेक, सकाळी ९.३० वाजता श्रींची महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ५.३० वाजता श्री संत सोहिरोबानाथ भजन मंडळ, बांदा यांचे भजन, सायंकाळी ७ ते ८.३० पालखी सोहळा, रात्री ९.३० वाजता ओंकार पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, वेंगुर्ले यांचा ''कुंकू झाले वैरी'' हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती व उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ इन्सुली यांच्यावतीने करण्यात आले आहे.
..................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com