रत्नागिरी

रत्नागिरी

कातकरवाडीमधील विद्युत खांब बदलला
खेड : तालुक्यातील आस्तान-कातकरवाडी येथे सरपंच ज्योती विलास निकम यांच्या घराशेजारील विद्युत खांब धोकादायक स्थितीत असून १२ कुटुंबांना धोका असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध करताच या वृत्ताची दखल महावितरणने घेऊन हा खांब बदलला. येथील सरपंच ज्योती विकास निकम यांच्या घराजवळील खांब वादळी वाऱ्याने केव्हाही पडून मोठी दुर्घटना होऊ शकते. धोकादायक खांब बदलण्याबाबत ग्रामपंचायतीने दोन महिन्यापूर्वी महावितरणकडे लेखी तक्रार दिल्याची माहिती ग्रामसेविका कुंभार यांनी दिली होती. या प्रकरणी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी महावितरणला इशारा देत खांब बदलण्याची मागणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com