फोटोसंक्षिप्त-निमजगा शाळेस
संगणक संच भेट

फोटोसंक्षिप्त-निमजगा शाळेस संगणक संच भेट

फोटोसंक्षिप्त
९८९६८

निमजगा शाळेस
संगणक संच भेट
बांदा ः शहरातील निमजगा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेस उद्योजक समीर शेटकर यांनी आपले वडील शंकर कृष्णाजी शेटकर यांच्या स्मरणार्थ संगणक भेट दिला. श्री. शेटकर याचे शहरात शेटकरवाडी येथे मूळ घर असून सध्या ते बदलापूर येथे व्यवसायाच्या निमित्ताने राहतात. येथील त्यांचे बंधू शैलेश शेटकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप बांदेकर, सदस्य शैलेश शेटकर, वासुदेव तांडेल, शिवराम बहिरे, दीपक नाईक, बाळकृष्ण सावंत, संजू सामंत, मयूर लांगे, भावेश शेटकर उत्कर्ष शेटकर आदी उपस्थित होते. भविष्यात देखील शाळेच्या शैक्षणिक व भौतिक गरजासाठी मदत करण्याचे आश्वासन श्री. शेटकर यांनी यावेळी दिले.


सावंतवाडीत रविवारी रक्तदान शिबिर
सावंतवाडी ः येथील तालुका भंडारी मंडळ व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. ३०) भंडारी वसतिगृह, खासकीलवाडा-सावंतवाडी येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत रक्तदान शिबिर व हिमोग्लोबीन तपासणी तसेच रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीपः swt२७१८.jpg मध्ये फोटो आहे.

सावंतवाडी ः सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संस्थेचे तालुकाध्यक्ष शशिकांत कदम यांचा सत्कार करण्यात आला.

शशिकांत कदम यांचा
सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडी ः सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी संस्थेच्या कणकवली शाखेच्या पुनर्रचनेत तालुकाध्यक्षपदी शशिकांत कदम यांची निवड झाल्याबाबत त्यांचा संस्थाच्या कार्यकारिणी व सदस्यांनी सत्कार केला. कणकवली-जानवली येथील जलतरंग हॉटेलच्या सभागृहात संस्थाध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यावेळी ही निवड करण्यात आली. सचिवपदी बाजीराव कांबळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ कदम, खजिनदार सिद्धार्थ तांबे, संघटक विठ्ठल कदम व सल्लागार म्हणून प्रकाश कदम यांची निवड केली. नवनिर्वाचित कार्यकारिणीचे मान्यवरांनी अभिनंदन केले. कदम यांनी या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन, अशी ग्वाही दिली. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com