
रत्नागिरी ः निवृत्ती वेतनधारकांसाठी आयकर कपातीबाबत सूचना
निवृत्ती वेतनधारकांसाठी
प्राप्तीकर कपातीबाबत सूचना
रत्नागिरी, ता. २७ ः जिल्ह्यातील ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडून निवृत्ती वेतन प्रदान केले जाते, अशा सर्व निवृत्ती वेतन धारकांना २०२३-२४ पासून नवीन प्राप्तीकर प्रणाली लागू करण्यात आली आहे. जे निवृत्ती वेतनधारक प्राप्तीकर कपातीस पात्र आहेत (ज्यांचे वार्षिक निवृत्ती वेतन रुपये ७ लाखपेक्षा अधिक आहे ) अशा निवृत्ती वेतनधारकांचे नियमानुसार प्राप्तीकर कपात त्यांच्या निवृत्ती वेतनातून मे २०२३ पासून सुरू करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी. ज्या निवृत्ती वेतनधारकांना जुनी प्राप्तीकर प्रणाली स्वीकारावयाची आहे. त्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी २०२३-२४ केलेल्या गुंतवणुकीच्या तपशिलासह जुनी आयकर प्रणाली स्वीकारण्याबाबतचा लेखी अर्ज जिल्हा कोषागार कार्यालयाकडे त्वरित सादर करावा. तपशील सादर न केल्यास, नियमानुसार आयकर कपात त्यांच्या निवृत्ती वेतनातून करण्यात येईल. निवृत्ती वेतनधारकांनी आयकर माहिती तत्काळ कोषागारास सादर करून सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.