अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, 3 वर्षाचा सश्रम कारावास

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, 3 वर्षाचा सश्रम कारावास

३३ ( पान ३ साठी )

मुलीशी गैरवर्तन करणाऱ्यास ३ वर्ष कारावास

६ हजार रुपये दंड; दुचाकीने पाठलाग करून कृत्य

रत्नागिरी, ता. २७ ः अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्ररणी एकास येथील विशेष पोक्सो न्यायालयाने दोषी ठरवले. त्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि सहा हजाराचा दंडाची शिक्षा सुनावली. राकेश रमेश चव्हाण (वय ३६) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार २० सप्टेंबर २०२१ ला घडला होता.

अल्पवयीन मुलगी किराणा मालाच्या दुकानात गेली होती. दुकान बंद असल्यामुळे ती घरी परतत असताना राकेशने दुचाकीने तिचा पाठलाग करून गैरवर्तन केले. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक पी. व्ही. देशमुख यांनी केला. त्याच्यावर कारवाई करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आज या खटल्याचा निकाल विशेष पोक्सो न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे १६ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष पोक्सो अभियोक्ता अॅड. मेघना नलावडे यांनी काम पाहिले. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रिया बापट यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com