
गुणपत्रिकेसाठी 32 विद्यार्थ्यांचा उपोषणाचा इशारा
४१ (पान ३ साठी)
- rat२७p२७.jpg-
९८९९५
रत्नागिरी ः येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाकडे निवेदन देताना विद्यार्थी.
गुणपत्रिकेसाठी ३२ विद्यार्थ्यांचा उपोषणाचा इशारा
शासकीय अध्यापक महाविद्यालय ः चार दिवसाची मुदत
रत्नागिरी, ता. २७ ः येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील २०२०-२२ या कालावधीत बीएड् शिक्षण पूर्ण करणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांच्या चौथ्या सत्राच्या गुणपत्रिका अजूनही प्राप्त झालेल्या नाहीत. गुणपत्रिकेच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनी चार दिवसात गुणपत्रके प्राप्त झाली नाहीत तर उपोषण करू, असा इशारा दिला आहे.
आज शासकीय अध्यापक महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी याबाबत जाब विचारला आणि निवेदन दिले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी १७ मे २०२२ ला बीएड् चौथ्या सत्राची परीक्षा पूर्ण केली. ८ सप्टेंबर २०२२ ला ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आला; मात्र निकाल मुंबई विद्यापिठाकडून येण्यास उशिर होत आहे, असे कारण दिले गेले. त्यानंतर २६ मार्च २०२३ ला महाविद्यालयातून लिपिक व प्राचार्यांनी विद्यार्थ्यांकडून सर्व कागदपत्रे मागवून घेतली होती. विद्यार्थ्यांनी पुन्हा विचारणा केल्यावर पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने उशिर होत असल्याचे सांगण्यात आले. विद्यार्थी वैयक्तिकरित्या संबंधित विभागांमध्ये चौकशीकरिता मेल, पत्रव्यवहार करत आहेत. महाविद्यालयाकडून त्यांना सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याचे उत्तर दिले जात आहे. २६ एप्रिल २०२३ ला महाविद्यालयाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ९ विद्यार्थ्यांची नावे व त्यांनी जमा करावयाच्या कागदपत्रांची यादी पाठवण्यात आली होती. त्यात विद्यार्थ्यांनी नमूद कागदपत्रांची पूर्तता २८ एप्रिलपर्यंत न केल्यास त्यांच्या निकालाच्या विलंबाला पूर्णत: विद्यार्थी जबाबदार असतील, असे सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली; मात्र या वेळी महाविद्यालयाच्यावतीने पोच देण्यास नकार दिला गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्या वेळी तेजस्वी सावंतदेसाई, गौरी जोग, श्रीय भाटवडेकर, रिमाझ नेवरेकर, शिवानी शिवणेकर, शाहीन काझी, दीपाली वाघरे, अपूर्वा बापट, शरयू दळवी, सायली घैसास, अलोक जाधव, नूतन मोरे, आयशा बुडये, अंकिता सुर्वे, प्राची चौगुले, रूची दळी हे विद्यार्थी उपस्थित होते.