साहिल आरेकर यांनी घेतली शरद पवारांची भेट

साहिल आरेकर यांनी घेतली शरद पवारांची भेट

१६ (टुडे ३ साठी)
----------

- rat२७p१.jpg -
९८८७६
मुंबई ः जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष साहिल आरेकर यांनी पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली.

साहिल आरेकर यांनी घेतली शरद पवारांची भेट

चिपळूण, ता. २८ ः रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष साहिल आरेकर यांनी नुकतेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली.

आरेकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच पक्षाचे अध्यक्ष पवार यांची भेट घेतली आणि जिल्ह्यातील कामाचा आढावा दिला. ते म्हणाले, जिल्ह्यात युवकांच्या माध्यमातून पक्षबांधणीचा प्रयत्न सुरू आहे. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक कार्यक्रम राबवून युवकांना आकर्षित करत आहोत. स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षांची शिबिरे आयोजित केली आहेत. आमदार शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल सुरू आहे.
पक्षाचे जिल्हा निरीक्षक बबन कणावजे यांनीही पक्षाच्या कामाचा आढावा दिला. त्यानंतर पवार म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युवक कसे जोडले जातील यासाठी प्रयत्न करा की मोठी संधी पक्षाने तुम्हाला दिली आहे त्याचे सोने करा. राज्यात लवकरच लोकसभा तसेच त्या पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये तरुणांवर विशेष जबाबदारी देण्याची तयारी राष्ट्रवादीने केली आहे. देशाचे भविष्य असलेला तरुण जीवनात भरकटता कामा नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. युवकांना राजकारणात सक्रिय करताना त्यांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यावरसुद्धा विचार केला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com