शीळ येथील रस्त्यासाठी 38 लाख मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शीळ येथील रस्त्यासाठी 38 लाख मंजूर
शीळ येथील रस्त्यासाठी 38 लाख मंजूर

शीळ येथील रस्त्यासाठी 38 लाख मंजूर

sakal_logo
By

१२ (टूडे पान ३ साठी)

- rat२८p४.jpg ः
९९०८७
राजापूर ः श्री गांगोदेव ते वरचीवाडी रस्त्याचे लोकार्पण आणि उद्घाटन करताना आमदार राजन साळवी आणि मान्यवर.

शीळ येथील रस्त्यासाठी ३८ लाख मंजूर

आमदार साळवींचा पुढाकार ः गावविकासासाठी निधीचे आश्वासन

राजापूर, ता. २८ ः शहराजवळील शीळ येथील श्री गांगोमंदिर ते वरचीवाडी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आमदार राजन साळवी यांच्या पुढाकाराने ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन आमदार साळवी यांनी पूर्ण केले.
रस्त्याचे उद्घाटन आणि लोकार्पण आमदार साळवी यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, विभागप्रमुख संतोष हातणकर, तालुका महिला संघटक प्राची शिर्के, माजी सभापती सुभाष गुरव, सरपंच अशोक पेडणेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार साळवी म्हणाले, शीळवासियांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्ती झाली याचा मनस्वी आनंद होत आहे. भविष्यात गाव विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. या वेळी माजी सरपंच सावंत यांनी प्रस्तावना करताना गावातील अन्य दोन रस्त्याच्या कामांसाठी निधी उपलबध करून देण्याची मागणी केली. त्याप्रमाणे आमदार साळवी यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासित केले. या वेळी शीळ ग्रामपंचायत, शिवसेना शाखा आणि ग्रामस्थ यांच्यावतीने आमदार साळवी आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर, जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामसेवक डिगुळे यांचा आमदार साळवी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.