-आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सीएंनी पुढाकार घ्यावा

-आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सीएंनी पुढाकार घ्यावा

१७ (टुडे पान ३ साठी, सेकंड मेन)

- rat२८p३.jpg-
९९०८६
रत्नागिरी ः सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करताना सीए अर्पित काब्रा. सोबत सीए मुकुंद मराठे, सीए अभिलाषा मुळ्ये, सीए सौरभ अजमेरा, सीए केतन सैय्या आदी.


आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सीएंनी पुढाकार घ्यावा

सीए अर्पित काब्रा ः रत्नागिरी, सिंधुदुर्गतील ५० जणांची उपस्थिती

रत्नागिरी, ता. २८ ः चार्टर्ड अकाउटंट (सीए) हे देशातील एक उच्च विद्याविभूषित व देशातील सर्वांना आर्थिक शिस्त लावणारे प्रमुख असतात. अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या सीए इन्स्टिट्यूटतर्फे विद्यार्थी, सामाजिक संस्थांकरिता उपक्रम राबवण्यात येत आहेत. सीएंनी फक्त बॅंका, संस्थांचे ऑडिट हा एकाच विषय समोर न ठेवता देश घडवण्यासाठी पुढे आले पाहिजे. फॉरेन्सिक ऑडिट, परदेशांतील कंपन्या, संस्थांचे ऑडिट करणे यासह जीएसटीविषयक आणि आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सीएंनी पुढाकार घ्यावा. सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, पर्यावरण विषयक उपक्रमही राबवावेत, असे आवाहन सीए इन्स्टिट्यूटच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए अर्पित काब्रा यांनी केले.
सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे विवा एक्झिक्युटीव्ह येथे आयोजित धर्मादाय संस्था आणि प्राप्तिकर कायदा तसेच वस्तू व सेवा कर कायद्यातील बदल या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर सीए इन्स्टिट्युटच्या पश्चिम विभागाचे सचिव सीए सौरभ अजमेरा आणि खजिनदार सीए केतन सैया यांच्यासह रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मुकुंद मराठे, उपाध्यक्ष सीए अभिलाषा मुळ्ये, सचिव सीए शैलेश हळबे, कोषाध्यक्ष सीए अक्षय जोशी, विकासा अध्यक्ष सीए केदार करंबेळकर, सदस्य सीए प्रसाद आचरेकर प्रमुख उपस्थित होते.
कार्यशाळेस रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० सीए आणि धर्मादाय संस्थाचालकांनी हजेरी लावली. रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष सीए मराठे यांनी विविध कायद्यात होणाऱ्या बदलांमुळे आपण आपले ज्ञान अद्ययावत करण्यासाठी ही कार्यशाळा कशी उपयोगी ठरेल हे विषद केले. सूत्रसंचालन सीए धनश्री करमरकर यांनी केले.

--
विस्तृत मार्गदर्शन
कार्यशाळेत सीए इन्स्टिट्यूट पश्चिम विभागीय समितीचे सदस्य, नागपूर येथील सीए अभिजित केळकर यांनी धर्मादाय संस्था लेखापरीक्षणमधील अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच कोल्हापूर येथील सीए गिरीश कुलकर्णी यांनी धर्मादाय संस्था आणि वस्तू व सेवा कर कायद्यातील बदलांवर विवेचन केले. पुणे येथील अर्थविषयक लेखक, सीए दिलीप सातभाई यांनी धर्मादाय संस्था आणि प्राप्तीकर कायद्यातील बदलांवर पीपीटीच्या माध्यमातून सुरेख मार्गदर्शन केले. नागपूर येथील सीए प्रणव अष्टीकर यांनी धर्मादाय संस्था यांच्या लेखापरीक्षण अहवालामधील महत्वपूर्ण बदलांबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com