शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचे रविवारी संमेलन

शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचे रविवारी संमेलन

१८ (टुडे पान ३ साठी)

शिर्के प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचे रविवारी संमेलन

रत्नागिरी, ता. २८ ः रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेच्या २००० सालातील बॅचचे विद्यार्थी २३ वर्षांनी एकत्र येणार आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात जुन्या आठवणींचा उजाळा मिळणार आहे. रविवारी (ता. ३०) स्वयंवर मंगल कार्यालय आणि रंजन मंदिरमध्ये एकत्र येत शाळेतील सवंगडी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देणार आहेत.
रा. भा. शिर्के प्रशालेच्या सन २००० सालातील बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. जल्लोष जुन्या आठवणींचा या कार्यक्रमात माजी विद्यार्थी आपल्या जुन्या शालेय आठवणींना उजाळा देणार आहेत. या वेळी आजी-माजी शिक्षकही सर्व माजी विद्यार्थ्यांशी हितगूज करणार आहेत. बाहेरगावी असलेले अनेक माजी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ३० एप्रिलला सकाळी १० वा. स्वयंवर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम होईल. राष्ट्रगीत आणि शाळेच्या प्रार्थनेने कार्यक्रमाला प्रारंभ होईल. या वेळी आजी-माजी शिक्षकांचे स्वागत, मनोगत, त्यानंतर माजी विद्यार्थी आपल्या मनोगतातून आठवणींना उजाळा देणार आहेत. स्नेहभोजनानंतर सायं. ४ वा. रंजन मंदिरमध्ये माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर शाळेच्या अमृतमहोत्सवाच्या नियोजनावर चर्चा होणार आहे. मार्च २००० मध्ये शिर्के प्रशालेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com