
सिंधुदुर्गात ९६ टक्के घरपट्टी वसुल
99145
सिंधुदुर्गात ९६ टक्के घरपट्टी वसुली
ग्रामपंचायतींचा महसूल; पाणीपट्टीचीही ९८ टक्क्यापर्यंत वसुली
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षांत २३ कोटी २३ लाख ६८ हजार रुपये एवढी घरपट्टी निश्चित झाली होती. यातील २२ कोटी २८ लाख २६ हजार रुपये एवढी वसुली झाली असून उद्दिष्टाच्या ९६ टक्के वसुली झाली आहे. पाणीपट्टी ९ कोटी ६८ लाख ३६ हजार रुपये एवढी निश्चित झाली होती. त्यातील ९ कोटी ४५ लाख ८० हजार रुपये म्हणजे ९८ टक्के वसुली झाली आहे.
जिल्ह्यात २०२१-२२ ची घरपट्टी एक कोटी १४ लाख ३१ हजार रुपये एवढी थकित होती. २०२२-२३ साठी २२ कोटी ९ लाख ३७ हजार एवढी मागणी होती. एकूण २३ कोटी २३ लाख ६८ हजार एवढे वसुलीचे उद्दिष्ट होते. २०२१-२२ ची थकित वसुली १०० टक्के झाली असून २०२२-२३ मधील २१ कोटी १३ लाख ९५ हजार एवढी वसुली झाली आहे. दोन्ही मिळून २२ कोटी २८ लाख २६ हजार वसुली झाली असून ९६ लाख ४० हजार रुपये थकबाकी राहिली आहे. यात केवळ वैभववाडी तालुक्याने १०१ टक्के वसुली केली आहे. अन्य सातही तालुक्यांना १०० टक्के वसुली शक्य झालेली नाही.
पाणीपट्टी वसुलीचे एकूण ९ कोटी ६८ लाख ३६ हजार एवढे उद्दिष्ट होते. यात २०२१-२२ ची थकबाकी २७ लाख ११ हजार रुपये होती. २०२२-२३ साठी ९ कोटी ४१ लाख २५ हजार रुपयांची मागणी होती. यातील थकित २०२१-२२ ची वसुली १०० टक्के झाली आहे. २०२२-२३ च्या मागणीतील ९ कोटी १८ लाख ६८ हजार रुपये वसुली झाली आहे. एकूण ९ कोटी ४५ लाख ८० हजार रुपये एवढी वसुली झाली असून २९ लाख १ हजार रुपये वसुली शिल्लक राहिली आहे. एकूण वसुली ९८ टक्के झाली आहे. यात वैभववाडी १०२ टक्के, सावंतवाडी १०३, वेंगुर्ले १०१ टक्के वसुली झाली आहे. उर्वरित तालुक्यांना १०० टक्के वसुली झालेली नाही.
-----------
चौकट
१० टक्केचा खर्च १४७ टक्के
ग्रामपंचायतींना एकूण बजेटमधील १० टक्के खर्च महिला व बालकल्याण यासाठी राखीव ठेवायचा असतो. २०२२-२३ मध्ये यासाठी १३ लाख ७३ हजार खर्च निश्चित झाला होता. मात्र, ग्रामपंचायतीनी २० लाख २१ हजार रुपये खर्च केला आहे. उदिष्टाच्या १४७ टक्के खर्च झाला आहे. यात सर्वाधिक देवगड तालुक्यात २०२ टक्के खर्च केला आहे.
--------------
चौकट
१५ टक्केचा ९६ टक्के खर्च
ग्रामपंचायतींना एकूण बजेटमधील १५ टक्के निधी मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी राखीव ठेवायचा असतो. या खर्चाचे २०२२-२३ मध्ये ४ कोटी २२ लाख ८७ हजार रुपये एवढे उद्दिष्ट होते. यात २०२१-२२ मधील थकित खर्च १९ लाख ६७ हजार होता. तर २०२२-२३ साठी ४ कोटी ३ लाख २० हजार एवढा निश्चित झाला होता. यातील २०२१-२२ चा थकित १०० टक्के खर्च झाला असून २०२२-२३ मधील ३ कोटी ८४ लाख ३८ हजार एवढा खर्च झाला आहे. एकूण ४ कोटी ४ लाख ५ हजार एवढा खर्च झाला असून १९ लाख ६९ हजार रुपये खर्च शिल्लक राहिला आहे. एकूण मागणीच्या ९६ टक्के खर्च झाला आहे. यात कणकवली, मालवण, वैभवावडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या तालुक्यानी १०० टक्के खर्च केला आहे.
--------------
चौकट
१ कोटी ३५ लाख दिव्यांगांसाठी खर्च
महिला व मागासवर्गीय यांच्याप्रमाणे ग्रामपंचायतींना आपल्या एकूण बजेटमध्ये ५ टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवायचा असतो. २०२२-२३ या वर्षात ४३१ ग्रामपंचायतींना एक कोटी ३४ लाख ६९ हजार एवढा निधी निश्चित झाला होता. हा निधी १०० टक्के खर्च झाला आहे.
--------------
घरपट्टी वसुली तक्ता
तालुका*मागणी*वसुली*शिल्लक*टक्के
कुडाळ*४२३.९८*४१३.८.*१०.१७*९८
कणकवली*४७८.८०*४१९.४०*३०.६३*९४
मालवण*३०६.९७*२९३.९९*६.७६*९८
देवगड*३०८.९५*२८९.५४*१९.४१*९४
वैभववाडी*११८.९०*११९.८८*०.०*१०१
सावंतवाडी*३४८.२७*३३६.३९*११.८८*९७
वेंगुर्ले*२२५.७१*२१०.५२*१५.१९*९३
दोडामार्ग*११२.१०*१०९.७४*२.३६*९८
एकूण*२३२३.६८*२२२८.२६*९६.४०*९६
-------------
पाणीपट्टी वसुली तक्ता
तालुका*मागणी*वसुली*शिल्लक*टक्के
कुडाळ*११५.७४*११३.७८*१.९६*९८
कणकवली*२९२.२६*२७४.७८*१७.४३*९४
मालवण*६४.५२*६२.८१*१.७१*९७
देवगड*१७२.६४*१६५.७३*६.९१*९६
वैभववाडी*४१.५०*४२.१३*०.०*१०२
सावंतवाडी*१५९.७६*१६५.२२*०.०*१०३
वेंगुर्ले*५५.३८*५५.७४*०.०*१०१
दोडामार्ग*६६.५६*६५.५६*१.०*९८
एकूण*९६८.३६*९४५.८०*२९.०१*९८