अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ‘बॉयफ्रेंड कुडाळ’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत
‘बॉयफ्रेंड कुडाळ’ प्रथम
अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ‘बॉयफ्रेंड कुडाळ’ प्रथम

अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत ‘बॉयफ्रेंड कुडाळ’ प्रथम

sakal_logo
By

99121
पावशी ः विजेता बॉयफ्रेंड कुडाळ संघ.

अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत
‘बॉयफ्रेंड कुडाळ’ प्रथम
कुडाळ ः पावशी येथे सोहम तेजस स्पोर्टस् आयोजित बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत बॉयफ्रेंड कुडाळ संघ प्रथम तर किंगस्टार लक्ष्मीवाडी कुडाळ संघ द्वितीय ठरला. सोहम तेजस स्पोर्टसच्यावतीने पावशी-शेलटेवाडी येथे भव्य केपीएल बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा २१ ते २३ या कालावधीत झाल्या. या स्पर्धेप्रसंगी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. प्रेक्षणीय सामन्याची नाणेफेक त्यांच्या हस्ते करण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक बॉयफ्रेंड कुडाळ, द्वितीय क्रमांक किंगस्टार लक्ष्मीवाडी कुडाळ, तृतीय क्रमांक गवळदेव सेवन, चतुर्थ क्रमांक देवेंद्र स्मृती कुडाळ यांनी पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी सोहम तेजस स्पोर्टस अध्यक्ष महेश आळवे, पावशी ग्रामपंचायत सदस्य काका भोगटे, युवासेना उप तालुकाप्रमुख सागर भोगटे, अमित राणे, गुरु गडकर, शैलेश काळप, प्रसाद शेलटे, निलेश आळवे, कृष्णा आळवे, सदा अणावकर, राजू पाटणकर आदी उपस्थित होते.
-----------
ओवळीवे ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः ओवळीये (ता.मालवण) ग्रामपंचायतीतर्फे विविध विकासकामांची निविदा जाहीर करण्यात आली आहे. निविदा ८ मे रोजी सुटीचे दिवस वगळून ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावयाची आहे. त्याच दिवशी निविदा खुली केली जाणार आहे. यामध्ये पंधरा वित्त आयोगातून ओवळीये सिद्धगड विहिर दुरुस्त करणे ४२ हजार ३५० रुपये निधी मंजूर केला आहे. ओवळीये गावातील मागासवर्गीय वस्ती समाज मंदिर दुरुस्त करणे २ लाख ९९ हजार ९४८ रुपये आणि कचरापेटी खरेदी करण्यासाठी ६० हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अटी व शर्तीची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असून यात मान्यताप्राप्त ठेकेदारांनी निविदा सादर करावे, असे सरपंचांनी जाहीर केले आहे.
---
आशिये ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवली ः आशिये (ता.कणकवली) ग्रामपंचायतीतर्फे नोंदणीकृत ठेकेदारांकडून निविदा पत्रके मागविण्यात आली आहेत. ही दर पत्रके १० मे पर्यंत कार्यालयात स्वीकारली जाणार आहेत. आशिये ठाकरवाडी येथे गटार दुरुस्त करणे ९६ लाख ६६१ रुपये, मुख्य रस्ता ते शशिकांत पुजारे घरापर्यंत पायवाट करणे १ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुख्य रस्ता ते बाणेवाडी दिवाकर बाणे घरापर्यंत पायवाट ४९ हजार ९९८ रुपये मंजूर करण्यात आले असून तिन्हही कामांची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत आहे. कामाच्या अटी व शर्तीची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे, असे सरपंचांनी जाहीर केले आहे.
----
वेंगुर्लेत ६ मेस रेकॉर्ड डान्स स्पर्धा
वेंगुर्ले ः सिद्धार्थनगर मठतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त ६ मेस सायंकाळी ७.३० वाजता सिद्धार्थनगर मठ येथे जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. लहान गट व मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा होणार असून लहान गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे २०००, १५००, १००० व चषक तसेच मोठ्या गटातील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २००० व १००० व चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भाग घेवू इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे ४ मेपर्यंत दत्तप्रसाद मठकर यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन सिद्धार्थनगर मठतर्फे करण्यात आले आहे.