वीस ग्रामपंचायतींतील 38 जागांवर पोटनिवडणुका

वीस ग्रामपंचायतींतील 38 जागांवर पोटनिवडणुका

१३ (टूडे पान १ साठी)

वीस ग्रामपंचायतींतील ३८ जागांवर पोटनिवडणूका

इच्छुकांची मोर्चेबांधणी ः तीन ग्रामपंचायतीत ३ अर्ज दाखल

राजापूर, ता. २८ ः विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या ३८ जागांच्या पोटनिवडणूका जाहीर झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी चाचपणी करण्यासह उमेदवारी निश्‍चिती करण्यामध्ये राजकीय नेतृत्व आणि गावागावामधली स्थानिक नेतेमंडळी गुंतली आहेत. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी कालपर्यंत (ता. २७) तीन ग्रामपंचायतींमधून तीन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला कमी कालावधी शिल्लक राहिल्याने या काळामध्ये उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याला भाऊगर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत किती ग्रामपंचायतीमधून किती उमेदवारी अर्ज दाखल होणार याकडे साऱ्‍यांचे लक्ष लागले आहे. अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली आहे. राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांनीही मोर्चे बांधणी सुरू आहे. पोटनिवडणुका होत असलेल्या जागांची संख्या कमी आहे. संबंधित ग्रामपंचायतींवर राजकीयदृष्ट्या वर्चस्व राखणे वा आहे. ते वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्यादृष्टीने या पोटनिवडणुकांना राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांकडून या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत.
-----
पोटनिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायती
कोळवणखडी, नाणार, झर्ये, शेजवली, येळवण, ओझर, हसोळतर्फ सौंदळ, वडदहसोळ, नाटे, दसूर, वाल्ये, पांगरी खुर्द, गोवळ, पन्हळेतर्फ सौंदळ, अणसुरे, दळे, चिखलगाव, मंदरूळ, जवळेथर, काजिर्डा.
-
महिला उमेदवार शोधण्याचे आव्हान
पोटनिवडणुका होत असलेल्या ३८ जागांपैकी २४ जागा महिलांसाठी असलेल्या जागांचा समावेश आहे. रिक्त असलेल्या या बहुतांश जागा महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीमध्ये या जागांवर महिला उमेदवार शोधण्याचे आव्हान राजकीय पक्षांसह गावातील स्थानिक नेतृत्वासमोर ठाकले आहे.
--------------
असा आहे पोटनिवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे ः २५ एप्रिल ते २ मे
उमेदवारी अर्ज छाननी करणे ः ३ मे
उमेदवारी अर्ज मागे घेणे ः ८ मे
मतदान ः १८ मे
मतमोजणी ः २४ मे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com