उत्सव

उत्सव

१५ ( पान २ साठी)
९९२०० भवानी माता
९९२०९ भैरी
शृंगारपूरमधील भैरीभवानी मंदिरात
गुरुवार पासून उत्सव सुरू

चिपळूण, ता. २८ ः संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर येथील श्री भैरीभवानी प्रचितगट सेवा संस्थांनतर्फे सुर्वे कुळवंशाची कुलस्वामिनी श्री भैरीभवानी मूळपीठ श्रीक्षेत्र शृंगारपूर येथे दरवर्षीप्रमाणे वैशाख पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. हा उत्सव ४ व ५ मे रोजी शृंगारपूर येथे होणार आहे. यामध्ये सर्व देवता पूजा, गणेशपूजन, नांदी श्राद्ध, पुण्याहवचन, ब्रह्माडीमंडळ, देवता अभिषेक, षोड्शोपचारे स्थापना पूजन, देवीपाठांचे पठण, स्थापना, ग्रहस्थापना, अग्नीस्थापना, कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, ग्रह यज्ञांचे हवन, सप्तशती पाठांचे हवन, पूर्णाहूती व अखेर देवीचा गोंधळ असा कार्यक्रम आहे. देवीच्या गोंधळासाठी २२ जोडप्यांनी आपली नावे नोंदवली आहेत. या वर्षी मोठ्या संखेने भाविक उपस्थित राहणार आहेत. हे लक्षात घेऊन दोन्ही दिवस दुपारी महाआरती, दुपारी व रात्री श्रीक्षेत्र शृंगारपूरपिठात येणाऱ्या सर्व भाविकांसाठी कार्यक्रमाप्रित्यर्थ सेवार्थ चहा, अल्पोपाहार, भोजनव्यवस्था केली आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमास सहकुटुंब मित्रपरिवार उपस्थित राहावे व उत्सव साजरा करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष दीपक सुर्वे यांनी श्री भैरीभवानी प्रचितगड सेवा संस्थानतर्फे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com