रत्नागिरी ः पोलिसांच्या आई-बहिणी असत्या तर असे वागले असते का?

रत्नागिरी ः पोलिसांच्या आई-बहिणी असत्या तर असे वागले असते का?

बारसु पान 2 साठी)

99191

मारून टाका; पण मागे हटणार नाही
आंदोलक संतप्त; पोलिसांनी मारहाण केल्याचा आंदोलकांचा आरोप
रत्नागिरी, ता. २८ ः आमच्यावर दादागिरी करू नका. आंदोलक विरोधावर ठाम आहेत. आमचा विरोध कायम राहील. जमीन घेऊ देणार नाही. आम्हाला मारायचे मारा, मारून टाकायचे तर मारून टाका; पण आम्ही मागे हटणार नाही म्हणत कडाडून विरोध केला आहे. महिला आंदोलकांना या वेळी झालेल्या झटापटीवेळी लागले असून त्यांच्यावर उपचार कोण करणार? पोलिसांच्या आई-बहिणी असत्या तर ते असे वागले असते का? असा सवाल करत अनेक शेतकरी महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
बारसू रिफायनरीवरून वातावरण तापले असताना आज भडका उडाला. स्थानिक नागरिकांनी बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध केला. सर्वेक्षण रोखण्यासाठी या आधीही प्रयत्न केले होते. आज पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतांनाही नागरिकांनी सर्वेक्षण सुरू होते तेथे धाव घेतली. त्या वेळी पोलिस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये झटापट झाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. अनेक आंदोलकांना पोलिसांनी मारल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. बेशुद्ध झालेल्या व्यक्तींची जबाबदारी कोण घेणार, म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.
खरंतर, बारसू येथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे; मात्र, हा प्रकल्प होण्यापूर्वी माती सर्वेक्षण आणि इतर प्रक्रिया पार पाडली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विरोध सुरू केला आहे. विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार यांच्या उपस्थितीत निघणारा मोर्चा राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे होऊ शकणार नव्हता; मात्र, त्यापूर्वीच शेतकरी आक्रमक झाले होते. अनेक शेतकरी महिलांची आणि पोलिसांची झटापट झाल्यामुळे काहींना लागले आहे, असा दावा आंदोलकानी केला आहे.
आंदोलक महिला शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देताना पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांनी हटवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामध्ये अनेक महिलांना पोलिसांनी मारले, फरफटत नेले याशिवाय अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे अनेकजण बेशुद्ध पडले. पोलिसांना विरोध करून सर्वेक्षण रोखण्यासाठी जात असताना झटापट झाली. त्यात मोठा गोंधळ झाला होता. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी जे प्रयत्न केले त्यात काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले.


परिसरात संचारबंदी;
जमावावर लाठीमार
रत्नागिरी : बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते; परंतु ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रिफायनरीविरोधात मोर्चा काढण्याचे ठरवले होते. यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक लोक जमले होते. आंदोलनाची तयारी करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर स्थानिकांचा उद्रेक पाहायला मिळाला.
बारसू येथे महिला आणि युवक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असताना ज्या ठिकाणी सर्वेक्षण सुरू होते तिथे लोकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले; परंतु पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाल्याचं दिसून आले. जमाव मोठ्या संख्येने असल्याने पोलिसांनी लाठीमार केला. लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी अश्रुधूर सोडले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांची प्रकृतीही ढासळली. लाठीमारामुळे पळापळ झाली. अश्रुधूर सोडल्याने लोकांना चालता येत नव्हते. समोरचे दिसायचे बंद झाले. अनेकांच्या डोळ्यांना जळजळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून सर्वेक्षण स्थळावरून लोकांना हटवले.

पोलिसी बळावर हाताळला
जातोय बारसू प्रकल्पाचा प्रश्न
रत्नागिरी : जिल्ह्यातील बारसू भागात रिफायनरी प्रकल्पावरून वातावरण तापले असताना शिंदे-फडणवीस सरकार त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. बारसूचा प्रश्न पोलिस बळावर हाताळला जात असून, परिस्थिती चिघळली आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे रावणराज आहे. महाराष्ट्र अस्थिर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुटीवर तर उपमुख्यमंत्री मॉरिशिअसला गेले असून, दोघांची अवस्था ही बादशाह-ए-बेखबर अशी आहे, असा घणाघाती हल्ला प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
या संदर्भात लोंढे म्हणाले, ‘‘बारसू प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. स्थानिक लोकं रस्त्यावर उतरले आहेत; पण त्यांच्यावर पोलिस बळाचा वापर केला जात आहे. सरकार जनतेशी संवाद साधत नसून पोलिसांच्या दंडेलीच्या जोरावर आंदोलकांवर अत्याचार करत आहे. पोलिस महिलांना मारहाण करत आहेत, बदडत आहेत. आंदोलक महिलांचे मोबाईल फोन, सोन्याचे दागिने हे पोलिसांनी हिसकावून घेतले व आता त्या वस्तूही परत देत नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पोलिस जनतेच्या रक्षणासाठी आहेत की चोऱ्यामाऱ्या करण्यासाठी आहेत? या घटनेची चौकशी करून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई झाली पाहिजे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com