वित्त विभागात झाडाझडती

वित्त विभागात झाडाझडती

वित्त विभागात झाडाझडती

वरिष्ठ सहाय्यक निलंबित; अधिकाऱ्यांचा पदभार लेखाधिकाऱ्यांकडे

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः जिल्हा परिषद वित्त विभागातील वरिष्ठ सहाय्यकांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी निलंबित केले. संबंधित लेखाधिकाऱ्यांकडे असलेला उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी पदभार काढून घेत लेखाधिकारी रिझवान पिंपरी यांच्याकडे दिला आहे. या दोघांनाही ठेकेदारांनी बिले मंजुरीबाबत केलेली तक्रार भोवली असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या दोन्ही कारवाई प्रशासकीय कारणास्तव केल्याचे आदेशात नमूद केले आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेची कामे करणाऱ्या ठेकेदारांनी प्रशासक नायर यांची भेट घेतली होती. यावेळी वित्त विभागात बिले वेळेत मंजूर केली जात नाहीत. ती जाणून बुजून रखडवली जातात. पैसे घेऊनही बिले मंजूर केली जात नाहीत, अशी तक्रार केली होती. याची तात्काळ दखल घेत प्रशासक नायर यांनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांना घेऊन अचानक वित्त विभाग कार्यालयाला भेट दिली होती. यावेळी नायर यांनी केलेल्या तपासणीत वरिष्ठ सहाय्यकांचा कारभार संशयास्पद आढळला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. अखेर काल (ता.२७) रात्री उशिरा नायर यांनी ही कारवाई केली व निलंबित केल्याचे आदेश काढले. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुडाळ पंचायत समितीत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
-------------
चौकट
उपमुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यावरही कारवाई
ठेकेदारांनी केलेल्या तक्रारींचा रोष प्रभारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांवर होता. त्यामुळे प्रशासक नायर त्यांच्यावर कोणती कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. वरिष्ठ सहाय्यकांना निलंबित करताना नायर यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचाही पदभार काढून घेतला आहे. हा पदभार दुसरे लेखाधिकारी रिझवान पिंपरी यांच्याकडे दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com