बहादूरशेख नाक्यात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बहादूरशेख नाक्यात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर
बहादूरशेख नाक्यात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

बहादूरशेख नाक्यात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

sakal_logo
By

७ (पान ६ साठी, मेन)

- ratchl२९१.jpg ः
९९२८९
चिपळूण ः बहादूरशेखनाका येथील चौकात रस्त्यावर केले जाणारे पार्किंग.
-ratchl२९२.jpg ः
९९२९०
रोहन नलावडे
-ratchl२९३.jpg ः
९९२९१
तुषार शिंदे
-

बहादूरशेख नाक्यात पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

वाहनतळाची मागणी ; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २९ ः तालुक्यातील ग्रामीण भागातून लोटे औद्योगिक वसाहतीत नोकरदार वर्गाची संख्या शेकडोंच्या घरात आहे. यापूर्वी पूर्व विभागाकडून येणारे अनेक कर्मचारी बहादूरशेखनाक्यात दुचाकी, चारचाकी पार्किंग करून लोट्यात जायचे. चौपदरीकरणानंतर येथील पार्किंगचा प्रश्न जटिल बनला आहे. शेकडो कर्मचाऱ्यांची पार्किंग व्यवस्थेअभावी परवड होत आहे. रस्त्याशेजारी लावलेल्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनतळ उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रोजगारासाठी चिपळूणच्या पूर्व विभागातील सती ते शिरगाव, पोफळी, दसपटी विभागातील ग्रामीण भागातून शेकडो कर्मचारी रोज ये-जा करतात. कंपनी बस अथवा एसटीने चिपळूण ते लोटे प्रवास करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना तीनही पाळ्यांमध्ये कामावर जाण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (बहादूरशेख नाका) येथे येण्यासाठी दुचाकीचा वापर करावा लागतो. या परिसरात पालिकेची कोणतीही पार्किंगव्यवस्था नाही. परिणामी, कर्मचारी नाईलाजाने मिळेल तिथे रस्त्याच्या कडेला, व्यावसायिक इमारतींच्या समोर गाड्या लावून जातात. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे पार्किंगची समस्या अधिक गंभीर बनली असून, या वाहनांमुळे गर्दीच्या वेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढे येण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, नवीन येणारे उद्योग यांना अनुसरून नियमित करभरणा करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी शासनाने पार्किंगसारखी मूलभूत सुविधा द्यावी. कामगारांची गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना हाती घ्यायला हव्या होत्या; मात्र या बाबतीत आजपर्यंत राजकीय मंडळींकडून तसेच शासकीय यंत्रणांकडून देखील दुर्लक्ष झाले आहे. वाढती वाहने आणि वाहतूककोंडीचा जटिल प्रश्न विचारात घेता याबतीत धोरणात्मक निर्णय घेऊन कामगारांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
--
कोट
नियोजित उड्डाणपुलाखालील जागा ग्रामीण भागातील नागरिकांसाठी वाहनतळासाठी राखीव ठेवून अद्ययावत पार्किंगची सुविधा दिल्यास नागरिकांची गैरसोय टाळू शकेल. वाहतुकीस अडथळाही येणार नाही. दुसरा पर्याय याच परिसरात पालिकेची लघुउद्योगांसाठी जागा अनेक वर्षे वापराविना पडून आहे. त्यातील काही जागेत पालिकेमार्फत पे अँड पार्क पद्धतीने सुरक्षित बंधिस्त वाहनतळ उभारलयास शेकडो कामगारांचा पार्किंगचा प्रश्न कायमचा सुटू शकेल.
- तुषार शिंदे, सामाजिक कार्यकर्ते
---
कोट

ग्रामीण भागातील उदरनिर्वाहासाठी औद्योगिक वसाहतींमध्ये जाणारे कर्मचारी शासनास नियमितपणे कर भरत असतात. वाहन घेताना देखील याच सुविधांसाठी कर भरावा लागतो. त्या बदल्यात शासनाकडून पार्किंसारखी मूलभूत सुविधा मिळणे हा सामान्य नागरिकाचा अधिकार आहे.
- रोहन नलावडे, अभियंता-शिरगाव