अभियांत्रिकी महाविद्यालयाला गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभियांत्रिकी महाविद्यालयाला गौरव
अभियांत्रिकी महाविद्यालयाला गौरव

अभियांत्रिकी महाविद्यालयाला गौरव

sakal_logo
By

१७ (पान २ साठी)

माने अभियांत्रिकी महाविद्यालयाची
नॅक मुल्याकंनात भरारी

साडवली, ता. २९ ः राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) यांच्यातर्फे नुकत्याच झालेल्या पुनर्मुल्यांकन प्रक्रियेत आंबव येथील राजेंद्र माने कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजीला बी ++ श्रेणी देऊन गौरवण्यात आले आहे. नॅकच्या तज्ञ समितीच्या उपस्थितीत महाविद्यालयामध्ये ही प्रक्रिया पार पडली. महाविद्यालयामधील अध्यापन आणि अध्ययनाची गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि संसाधने, अभ्यासक्रमांची निवड आणि अंमलबजावणी, परीक्षा पद्धती व विद्यार्थ्यांचे निकाल, शैक्षणिक व सहशैक्षणिक विभागातील महाविद्यालयाची कामगिरी, संशोधन कार्य व प्रकाशने, प्रशासकीय सेवा सुविधा अशा अनेक गोष्टींची तज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करून हे मुल्यांकन या परिषदेमार्फत केले जाते.
२०१७ ला महाविद्यालयाला पहिल्यावेळी बी + श्रेणी मिळाली होती. यावर्षी पाच वर्षाच्या विहित मुदतीनुसार महाविद्यालयाचे दुसऱ्यावेळी पुनर्मुल्यांकन करण्यात आले. त्यामध्ये महाविद्यालयाने बी ++ श्रेणी प्राप्त करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक व माजी राज्यमंत्री रवींद्र माने, उपाध्यक्ष मनोहर सुर्वे, कार्यकारी अध्यक्षा नेहा माने यांनी प्राचार्य डॉ. महेश भागवत तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.