संगमेश्वर तालुक्यात धावला पहिला टॅंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर तालुक्यात धावला पहिला टॅंकर
संगमेश्वर तालुक्यात धावला पहिला टॅंकर

संगमेश्वर तालुक्यात धावला पहिला टॅंकर

sakal_logo
By

२३ (पान २ साठी)
(टीप- ही बातमी २४ नंबरच्या टंचाईच्या बातमीत पोटबातमी म्हणून घ्यावी.)

संगमेश्वर तालुक्यात धावला पहिला टॅंकर

पाचांबेत टंचाई ; आणखी चार गावांची मागणी

साडवली ः संगमेश्वर तालुक्यामध्ये उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून पहिला टँकर गुरूवारपासून सुरू करण्यात आला आहे. तालुक्यातील पाचांबे या गावांमध्ये हा पहिला टँकर धावला आहे. तालुक्यामध्ये गेल्या १५ दिवसांपासून पाचांबे गावाकडून टँकरची मागणी करण्यात आली होती. या गावाची पंचायत समिती व तहसीलदार कार्यालयाकडून संयुक्त पाहणी करण्यात आली. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता टँकरची आवश्यकता असल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला होता. या कार्यालयाकडून शासकीय एक टँकर तालुक्याला मंजूर करण्यात आला. हा टँकर पाचांबे गावातील नेरदवाडी व जखिणटेप या वाड्यांसाठी रवाना करण्यात आला. अजूनही तालुक्यामधून चार गावे व आठ वाड्यांनी टँकरची मागणी केली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार, लवकरच गाव व वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पंचायत समिती सुत्रांनी दिली आहे.