रिक्षा सौंदर्य स्पर्धेत 50 चालकांचा थरार

रिक्षा सौंदर्य स्पर्धेत 50 चालकांचा थरार

. ३२ (पान ५ साठी)

रत्नागिरीत आज रिक्षा सुंदरी स्पर्धा

रत्नागिरी, ता. २९ : श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून रत्नागिरी रिक्षा सुंदरी या अनोखी रिक्षा सौंदर्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, निपाणी, मुंबई, पुणे, रायगड अशा विविध जिल्ह्यातून सुमारे पन्नास जणांचा सहभाग आहे. व्यवसायासाठी वापरणाऱ्या रिक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने कशी सजावट केली जाते हे रत्नागिरीकरांना रविवारी (ता. ३०) पाहायला मिळणार आहे, असे तुषार साळवी यांनी सांगितले.
ही स्पर्धा रत्नागिरीतील मारुती मंदिर सर्कल येथील हॉटेल वायंगणकर शेजारी असलेला पार्किंगच्या जागेत आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये दोन गट निश्चित असून पहिला गट २०१९ ते २०२३ या कालावधीमधील रिक्षा आणि दुसऱ्या गटामध्ये २०१९ पूर्वीच्या सर्व रिक्षांना सहभागी होणार आहेत. या रिक्षा सौदर्य स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये दोन चाकांवर रिक्षा चालवणे, रिव्हर्स गिअर मध्ये रिक्षा चालवणे अशी चित्तथरारक प्रात्यक्षिकेही रत्नागिरीकरांना पाहायला मिळणार आहे. पालकमंत्री उदय सामंत आणि उद्योजक किरण सामंत यांच्या शुभहस्ते विजेत्या रिक्षा चालकांचा सन्मान केला जाईल. सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com