10,952 विद्यार्थी शाळेत पहिले पाऊल टाकणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10,952 विद्यार्थी शाळेत पहिले पाऊल टाकणार
10,952 विद्यार्थी शाळेत पहिले पाऊल टाकणार

10,952 विद्यार्थी शाळेत पहिले पाऊल टाकणार

sakal_logo
By

३४ (पान ५ साठी, अॅंकर)

-rat२९p१४.jpg-
९९४०२
देवरूख ः येथील निवेबुद्रुक प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात दाखलपात्र विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करताना.
-rat२९p१५.jpg-
९९४०३
देवरूख ः विद्यार्थ्यांचे औक्षण करताना महिला.
--
आकरा हजार विद्यार्थी शाळेत पहिले पाऊल

जिल्हा परिषद ः गावागावात मेळाव्यांची जोरदार तयारी

रत्नागिरी, ता. २९ ः प्राथमिक शिक्षणाचा पहिला टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहिलीच्या वर्गात यंदा जिल्ह्यातील १० हजार ९५२ विद्यार्थी पहिले पाऊल टाकणार आहेत. शासनाच्या ‘पहिले पाऊल’ उपक्रमाची जिल्ह्यात जोरदार सुरवात झाली आहे.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा पूर्वतयारी करण्यासाठी ‘पहिले पाऊल’ या कार्यक्रम राबवला जात आहे. यामध्ये शिक्षण विभागासोबत महिला बाल विकास, स्थानिक सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांचा सहभाग घेतला आहे. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पहिलीत दाखल मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी ‘पहिले पाऊल’ उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. हा कार्यक्रम राज्यातील प्रत्येक वाडीवस्तीवर राबवला जाणार आहे. यामधून शाळेतील विद्यार्थ्यांची प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होईल. पहिले पाऊल कार्यक्रमांसाठी जिल्ह्यांमध्ये मेळावे सुरू आहेत. या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात जून महिन्यात शालेय शिक्षण, महिला व बालविकास आणि सहभागी घटकांनी सहभागी होऊन प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शाळा प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन माता-पालकांना, मुख्याध्यापक व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करून हा उपक्रम राबवला जात आहे. यावर्षी जिल्ह्यातील १० हजार ९५२ विद्यार्थी श्रीगणेशा करणार आहेत. या विद्यार्थ्यांना जूनमध्ये शिक्षणाच्या प्रवाहात अधिकृतपणे दाखल करून घेण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, प्रभारी उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी मेळावे घेऊन दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात आहे.
-----
ढोलताशांच्या गजरात स्वागत

संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक शाळेमध्ये पहिले पाऊल हा उपक्रम राबवण्यात आला. दाखल होणाऱ्या मुलांचे ढोल-ताशांच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांचा संयुक्त मेळावा झाला. यावेळी केंद्रप्रमुख प्रवीण त्रिभुवने, दीपाली कुवळेकर तसेच पालकवर्ग उपस्थित होता.