भोसले नॉलेज सिटी पतसंस्थाध्यक्षपदी प्रभू

भोसले नॉलेज सिटी पतसंस्थाध्यक्षपदी प्रभू

swt2935.jpg
99469
सावंतवाडीः भोसले नॉलेज सिटी पतसंस्था अध्यक्ष अमर प्रभू व अन्य.

भोसले नॉलेज सिटी पतसंस्थाध्यक्षपदी प्रभू
सावंतवाडी : येथील यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अमर प्रभू, तर उपाध्यक्षपदी रश्मी महाबळ यांची निवड करण्यात आली. पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत नवीन कार्यकारी मंडळ निवडण्यात आले. यात अध्यक्षपदी प्रभू, तर उपाध्यक्षपदी महाबळ यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सहकारी संस्था सहाय्यक निबंधक राजन आरावंदेकर यांनी काम पाहिले. यात सदस्यपदी गजानन भोसले, ओंकार पेंडसे, तुषार रुकारी, सत्यजित साठे, राजन शेट्ये, मानसी कुडतरकर, प्रीती डोंगरे, सुनील पाटील, दिनेश चराठकर यांची निवड करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com