उर्फी गावातील विकासकामे मार्गी लावणार

उर्फी गावातील विकासकामे मार्गी लावणार

उर्फी गावातील विकासकामे मार्गी लावणार
आमदार योगेश कदमः भूमिपूजन व उद्घाटनांची झंझावात
गावतळे, ता. ३०ः शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यासोबत पूर्वीपासूनच असलेला उर्फी गाव आजही तितक्याच ताकतीने, एकजुटीने माझ्या सोबत आहे. याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे उर्फी गावाचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे, असे मत दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केले.
दापोली तालुक्यातील उर्फी येथे हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. दापोली मतदार संघात सध्या विकास कामांचे, भूमिपूजन व उद्घाटन या कार्यक्रमाचा झंझावात आमदार कदम यांनी सुरू केले आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता असल्याने याचा फायदा मतदारसंघाच्या विकासाकरिता होत असून फार मोठ्या प्रमाणात विकास निधी आणण्यात आमदार कदम यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे खेडोपाड्यात विकास कामे वेगाने सुरू आहेत.
या कार्यक्रमात बोलताना आमदार योगेश म्हणाले, उर्फी गावाने आता विकासकामांची चिंता करू नये. ग्रामसडक योजनेंतर्गत उर्फी खळेवाडी मुख्य रस्ता, उर्फी खळेवाडी ते बोरीचा कोंड या दोन्ही रस्त्यांच्या विकास कामांना प्राधान्याने मंजुरी देणार आहे. या कार्यक्रमाला विधानसभा क्षेत्र संघटक प्रदीप सुर्वे, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, जिल्हा परिषद माजी सदस्य अनंत करबेले, समन्वयक विश्वास खांबे, मुंबई अध्यक्ष शांताराम खळे, भागप्रमुख दिनेश जावळे, सरपंच सौ. रेखा खोपटकर, उपसरपंच दिनेश खळे, माजी सरपंच महेंद्र खळे, फणसू गाव अध्यक्ष किशोर सुर्वे, उत्तम पवार, शिरवणे सरपंच सागर रेमजे, रमेश खोपटकर, युवा अधिकारी कैलास मळेकर, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com