रत्नागिरी- नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्याख्यान

रत्नागिरी- नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्याख्यान

rat30p5.jpg-
99538
रत्नागिरी : अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्याख्यान देताना प्रा. सचिन सनगरे.
------------
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात
नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्याख्यान
रत्नागिरी, ता. ३० : सामाजिक न्याय पर्वानिमित्त ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात व्यसनाधिनता आणि आजची तरुण पिढी या विषयावर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाचे प्रा. सचिन सनगरे यांनी व्याख्यान दिले. या वेळी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. चिंतामणी दामले, पर्यवेक्षिका प्रा. अस्मिता कुलकर्णी, कला विभाग प्रमुख प्रा. वैभव कानिटकर, प्रा. प्रदीप रणनवरे उपस्थित होते.
प्रा. सनगरे म्हणाले, आपले शरीर अमूल्य आहे. नशेच्या आहारी जाऊन या अनमोल शरीराची वाताहत करू नये. तणावमुक्त जीवनासाठी नशेच्याऐवजी पुस्तके, निसर्गाचे सान्निध्यात राहावे. दूरदर्शनवरील जाहिराती व सोशल मिडिया यातून जे चांगलं आहे ते स्वीकारावे. आपल ध्येय निश्‍चित करुन ते साध्य करण्यासाठी आपल्या क्षमता वापराव्यात.
प्रा. चिंतामणी दामले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपल्या समोरची प्रलोभने बाजूला ठेवुन उत्तम आयुष्य जगण्यासाठी या गोष्टी करायला हव्या त्यावर लक्ष केंद्रीत करा. या व्याख्यानाला कला शाखेतील प्रा. दिलीप सरदेसाई, प्रा. जलील हुश्ये, प्रा. मानसी गानू, प्रा. स्मिता पाथरे, प्रा. क्षमा पुनसकर, डॉ. राजेश कांबळे, प्रा. योगिता गायकवाड, प्रा. सुनिल भोईर, कला शाखेतील ३०६ विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. निनाद तेंडुलकर यांनी केले. प्रा. अभिजीत भिडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com