चिपळूण ःदुरुस्तीच्या गर्तेत अडकला एन्रॉन पूल

चिपळूण ःदुरुस्तीच्या गर्तेत अडकला एन्रॉन पूल

rat३०p१४.jpg-
९९५५३
चिपळूणः दुरुस्तीच्या गर्तेत अडकलेला एन्रॉन पूल.
-------------
दुरुस्तीच्या गर्तेत अडकला एन्रॉन पूल
वाहतुकीसाठी बंद; प्रवाशांसह कामगारांचीही गैरसोय
चिपळूण, ता. ३०ः चिपळूण व परिसरात २१ जुलै २०२१ आलेल्या महापुरात गोवळकोट-पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पूल खचला होता. पुलाच्या दुरुस्तीसाठी निविदावर निवादा काढल्यानंतर दुरुस्तीला सुरवात झाली; मात्र हे दुरुस्तीचे काम पुन्हा एकदा रखडले आहे. आधी मोडला आणि आता तुटला, अशी बिकट अवस्था या पुलाच्या बाबतीत निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीत व महापुरात एन्रॉन पूल मध्यवर्ती भागात खचला. त्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोणतीही दुर्घटना घडू नये याची खबरदारी घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला; मात्र हा पुल वाहतुकीसाठी बंद केल्याने प्रवाशीवर्गासह स्थानिक नागरिक आणि लोटे एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत आहे. शिवाय मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेठमापच्या अंतर्गत मार्गावर वाढल्याने सातत्याने वाहतूककोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या एन्रॉन पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांकडून प्रयत्न सुरू आहेत. आमदार शेखर निकम यांनी अधिवेशनात हा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तातडीने या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला.
या पुलाच्या कामासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता करून व तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोनवेळा निविदा प्रक्रिया पार पडली होती; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसरी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये देवरे ॲण्ड कंपनीला या कामाचा ठेका मिळाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमरदिप रामसे यांनी महिनाभरापूर्वी ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश दिले; परंतु महिना होऊन या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू न केल्याने ओरड केली जात होती; मात्र आता पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याच्यादृष्टीने या कामाला सुरवात केली आहे. एन्रॉन पुलाच्या खचलेल्या ठिकाणी तीन भागात पूल तोडून नंतर तो जॅकने उचलला जाणार आहे. त्याप्रमाणे तीन ठिकाणी पूल तोडण्याचे काम झाले. मात्र त्यानंतरहीचे काम रखडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com