मानेज इंटरनॅशनलमध्ये मुलांसाठी आनंद मेळा

मानेज इंटरनॅशनलमध्ये मुलांसाठी आनंद मेळा

मानेज इंटरनॅशनलमध्ये
मुलांसाठी आनंद मेळा
रत्नागिरी, ता. ३० : मानेज इंटरनॅशनल स्कूल या सी. बी. एस. ई. बोर्डाच्या शाळेमध्ये खास मुलांसाठी आनंदमेळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेमार्फत खास मुलांसाठी व पालकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, गमतीशीर खेळ यांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत तीन ते पाच या वयोगटातील मुलांसाठी बेबी शो, चमचा गोष्टी, चित्रकला, बिस्कीट खाण्याची स्पर्धा, फुगे फोडणे, बेडूक उडी, कविता गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा तर इयत्ता आठवी ते बारावीच्या मुलांसाठी पाककला स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच बरोबर पालकांसाठी रस्सीखेच, संगीत खुर्ची, रॅम्प वॉक सरप्राईज गेम्स, लकी ड्रॉ चे आयोजन केले गेले.
सौरभ मलुष्टे, शाळेचे व्यवस्थापक प्रद्युम्न माने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमन अरोरा, समन्वयिका मुन अन्वर मिरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य आणि कराटे प्रात्यक्षिक सादर करून आपल्या विविध कलागुणांचे प्रदर्शन केले. यानंतर विविध स्पर्धांना सुरुवात झाली. कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आणि उपस्थितांसाठी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले. विविध स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com