शाळेच्या विकासासाठी पुढाकार घ्या

शाळेच्या विकासासाठी पुढाकार घ्या

swt303.jpg
99558
बिबवणे ः लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन करताना उद्योजक विवेकानंद नाईक. बाजूला राजाराम सावंत, शरद नाईक, विलास मळगावकर, दयानंद सामंत आदी. (छायाचित्र ः सूरज कुडपकर)

शाळेच्या विकासासाठी पुढाकार घ्या
राजाराम सावंतः बिबवणेत नूतन इमारतीचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३०ः दर्जेदार शिक्षणाबरोबरच शाळेची सुसज्ज व पुरेशी इमारत हा शाळेच्या प्रगतीचा भाग आहे. याच विचारातून संस्थेने लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाचा संकल्प हाती घेतला आहे. या कार्यात प्रत्येकाने योगदान द्यावे. आपली शाळा पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन संस्थाध्यक्ष राजाराम सावंत यांनी बिबवणे येथे केले.                   
बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोडामार्ग येथील उद्योजक विवेकानंद नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी संस्थाध्यक्ष श्री. सावंत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यालयाचे माजी विद्यार्थी विलास खवणेकर, माजी सीईओ शरद नाईक, माजी उपाध्यक्ष दयानंद सामंत, माजी सचिव रमाकांत चव्हाण, दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गवस व दिनकर उगवेकर, सीनियर इंजिनियर सुभाष कामत, मुंबई विद्यापीठाचे प्रा. श्रीधर पेडणेकर, संस्था उपाध्यक्ष आनंद गावडे, सचिव व माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, खजिनदार भरत सामंत, सहसचिव विठ्ठल माळकर, संचालक वामन सावंत, वामन राऊळ व निखिल ओरोसकर, बिबवणे सरपंच शीतल कुडपकर, उपसरपंच दीपक सावंत, ग्रामंचायत सदस्या अंजली सुर्वे, मुख्याध्यापिका एस. एस. परब, सेवानिवृत्त शिक्षक विलास मळगावकर व मधुकर कुबल, इंजिनियर रुपेश तवटे, आर्किटेक्ट अभिषेक माने, माजी सरपंच दत्ताराम कुबल, स्मिता आरोलकर, नारायण राऊळ, सौ. खानोलकर, गणपत शिरोडकर, डॉ. संतोष जाधव, अनिल शिरोडकर, वसंत बिबवणेकर, वामन गावडे, अजय गावडे, प्रकाश सावंत, सतीश पडते, ग्रामपुरोहित राजू धुपकर यांच्यासह माजी विद्यार्थी, संस्था सभासद ,ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद नाईक यांनी, चांगले शिक्षण घेऊन आयुष्यात भरारी घ्या, असे आवाहन केले. शरद नाईक यांनी विद्यार्थ्यांनी शाळेच्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करावी, असे आवाहन केले. श्रीधर पेडणेकर यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार मुख्याध्यापिका सौ. परब व संस्था पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक प्रकाश कुबल यांनी केले तर आभार भास्कर पारधी यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com