चिपळूण-घनकचरा प्रकल्पस्थळी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

चिपळूण-घनकचरा प्रकल्पस्थळी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

फोटो ओळी
- rat३०p१५.jpg-KOP२३L९९५६१ चिपळूण ः पालिकेच्या कचरा प्रकल्पाकडे जाणारा नवीन रस्ता वळणावर उखडला आहे.

घनकचरा प्रकल्पस्थळी जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था

चिपळूण पालिका ; डांबरीकरणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
चिपळूण, ता. ३०ः शहरातील शिवाजीनगर येथील पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे; मात्र कचरा गाड्यांच्या वाहतुकीमुळे पहिल्या टप्प्यातील काही ठिकाणचा डांबरीकरण केलेला रस्ताच उखडून चक्क माती व खडी बाहेर आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांकडून या कामाच्या दर्जाबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.
चिपळूण पालिका प्रशासनाकडून शासनाच्या विविध योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे जाणारा रस्ता हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. २ डिसेंबर २०२२ ला उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता. दीड कि.मी. अंतर असलेल्या या कामासाठी सुमारे ५२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित ठेकेदाराने काही दिवसांपासून या रस्त्याच्या कामाला सुरवात केली. रस्त्याच्या कामामुळे पालिका प्रशासनाने शहरातील सर्व घंटागाड्या दोन दिवस बंद ठेवल्या होत्या. खडीकरण व डांबरीकरणाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू होते. याच दरम्यान, चिपळूण नगर पालिकेच्या घंटागाडी या मार्गावर धावल्याने दोन ठिकाणच्या वळणावरचे खडीकरण व डांबरीकरण उखडले आहे. डोंगर उतारावरचा हा भाग असून, वळणाचा व अरुंद रस्ता आहे. या मार्गावर पालिकेच्या घंटागाड्या धावत असतात. या वाहनांमध्ये कर्मचारीही असतात. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, अशी मागणी होत आहे. या संदर्भात रस्त्याच्या कामाचा ठेका मिळवलेल्या ठेकेदाराशी संपर्क केला असता त्यांनी वळणावरचा काही भाग उखडत असल्याचे सांगितले. कामाचा हा पहिला टप्पा असून, अजून तीन टप्प्यात डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे उखडलेल्या रस्त्याची डागडुजी करूनच पुढील काम केले जाणार असल्याची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com