चिपळूण-लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे पुरस्कार जाहीर
चिपळूण-लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे पुरस्कार जाहीर

चिपळूण-लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

लोटे परशुराम उद्योजक
संघटनेचे पुरस्कार जाहीर
चिपळूण, ता. ३०: लोटे परशुराम उद्योजक संघटनेचे विविध पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. संघटनेचे सचिव कुंदन मोरे यांनी ही माहिती दिली.
लोटे परशुराम उद्योजक संघटनेतर्फे औद्योगिक विकासात विशेष योगदान देणाऱ्या लोटे ओद्योगिक वसाहतीमधील कंपनीतील व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी व कामगारांना उत्कृष्ठ व्यवस्थापक, उत्कृष्ठ सुरक्षा अधिकारी व गुणवंत कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. मागील चार वर्षापासून या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. यावर्षीही या पुरस्काराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
निवड समितीच्या सभेत गुणवंतांची निवड करण्यात आली. यामध्ये मोठ्या उद्योगामधून उत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी अनिल भोसले (घरडा केमिकल्स), लहान उद्योगामधून महेश सूर्यराव (गणेश आईस फॅक्टरी) यांची निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ठ सुरक्षा अधिकारी पुरस्कारासाठी आशिर्वाद मयेकर (घरडा केमिकल्स) यांची निवड करण्यात आली. मोठ्या उद्योगामधून गुणवंत कर्मयोगी पुरस्कारासाठी संकेत देवरखकर (घरडा केमिकल्स) व रमेश जाधव (यु.एस. व्ही प्रा. लि), तसेच लहान उद्योगामधून हेमंत कालेकर (पूजा इंडस्ट्रीज), व रवींद्र गजमल (योजना ऑरगॅनिक्स) यांची निवड करण्यात आली. पुरस्कार सोहळ्याचे वितरण लवकरच उद्योग भवन, लोटे येथे करण्यात येणार आहे.