राजापूर-राजापुरात आरोग्य शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर-राजापुरात आरोग्य शिबिराला प्रतिसाद
राजापूर-राजापुरात आरोग्य शिबिराला प्रतिसाद

राजापूर-राजापुरात आरोग्य शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

राजापुरात आरोग्य शिबिराला प्रतिसाद
राजापूर, ता. ३० ः लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीची राजापूर शाखा व भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर हॉस्पिटल, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरामध्ये नुकतीच आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले.
राजापूर नगर वाचनालयच्या सभागृहात झालेल्या शिबिराचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे, माजी नगरसेवक व वाचनालयाचे अध्यक्ष देवदत्त वालावलकर, दिलीप दीक्षित, दत्तात्रय रानडे, जी. आर. कुलकर्णी, श्रीनिवास अमृते, इमरान खोपेकर, रत्नागिरीच्या मार्केटींग विभाग प्रमुख सारीका कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाले. शिबिरामध्ये दहा रक्तदात्यांनी रक्तदान केले. ४० लोकांनी आरोग्यासह अन्य तपासण्या करून घेतल्या. शिबिरासाठी डेरवण हॉस्पिटलचे डॉ. वसंत शिंदे, डॉ. रवीपकाश अग्रवाल, नेत्र तज्ञ डॉ. सौरभ, अस्थीतज्ञ डॉ. बिजेंद्र यादव, डॉ. दर्शनी चिंचळोकर व सहकारी, राजेश गेल्ये, युवा उद्योजक विवेक गुरव यांचे सहकार्य लाभले. शिबिरामध्ये राजापूर आगारपमुख शुभांगी पाटील व आगारातील चालक वाहक यांनी सहकार्य केले. या वेळी लोकमान्य सोसायटीच्या राजापूर शाखेच्या शाखा व्यवस्थापक शमिका पंडीत, शुभंकर जठार, नितेश हरमले, संतोष नवाळे व साईश्‍वरी वालम आदी उपस्थित होते.