चिपळूण ः  बिग स्टोरी

चिपळूण ः बिग स्टोरी

बिग स्टोरी---लोगो

फोटो ओळी
- rat३०p२२.jpg- KOP२३L९९५९० चिपळूण ः परशुराम घाट
- rat३०p२३.jpg-KOP२३L९९५९१ घाटातील जुन्या रस्त्यावर करण्यात येणारा भराव.
- rat३०p२४.jpg-KOP२३L९९५९२ घाटात पावसाळ्यापूर्वी एक लेन पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
- rat३०p२५.jpg- KOP२३L९९५९३ घाटातील चौपदरीकरणाचे काम
- rat३०p२६.jpg-KOP२३L९९५९४ घाटातील धोकादयक ठिकाणी उभारण्यात येणारी संरक्षक भिंत.
- rat३०p२७.jpg-KOP२३L९९५९५ पर्यायी चिरणी मार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी.
- rat३०p२८.jpg-KOP२३L९९५९६ चिपळूण ः पावसाळयात घाट खचून वाहतूक विस्कळित होत असल्याने केंद्र सरकारकडून नव्या उपाययोजना राबवण्यासाठी नियुक्त केलेल्या टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (टीएचडीसीएल) या संस्थेद्वारे अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
------------

इंट्रो
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वाधिक अवघड आणि अडथळ्यांचे काम ठरले ते परशुराम घाटाचे. येथील आव्हान दुहेरी होते. सुरवातीपासून काम सुरू असताना पेढे परशुराम येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आले. त्यांना आंदोलन करावे लागले. या आंदोलनातूनही काही निष्पन्न झाले नाही. मग न्यायालयीन लढा सुरू झाला व न्यायालयाच्या निकालानंतर सुरू झाला आव्हानांचा पुढचा टप्पा. घाटातील विशिष्ट प्रकारची जडणघडण, उंची, कातळाचा कठीणपणा, काही ठिकाणी अति भुसभुशीत माती, पावसामुळे डोंगराला पडलेल्या भेगा आणि या परिस्थितीत काम करत असताना वाहतूकही सुरू ठेवण्याचे महाकठीण काम, या साऱ्यात कंत्राटदार, नियोजन करणारे खाते, नागरी खाती, वाहतूक खाते या साऱ्यांची परीक्षा बघितली गेली. यातील सर्व खाती नियोजनाच्या पातळीवर जवळजवळ नापासच ठरली. कोणाचा कोणाला समन्वय नाही आणि लोकांचे हाल सुरू, अशा स्थितीत काम रेटले गेले. वर्षभरात पावसाचे आव्हानही पेलण्यात आले. त्यानंतर न्यायालयीन दणका आणि राजकारण्यांची गरज यामुळे आता कामाने वेग पकडला आहे. परशुराम घाटाची ही कहाणी म्हणजे नियोजनशून्यतेच्या कारभाराचा नमुना आहे. यातूनही घाटात प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांच्या जिगरीचे व कौशल्याचे कौतुक करावेच लागेल.

- नागेश पाटील, चिपळूण

परशुराम घाटातील दुहेरी आव्हान

प्रक्रियेचे, जनआंदोलनाचे अन डोंगराचे अडथळे; पावसापूर्वी कामाने घेतला वेग

न्यायालयाच्या आदेशानंतर परशुराम घाटातील कामास सुरवात झाली. शेतकरी कुळांना संपादित जागेचा शंभर टक्के मोबदला मिळावा, सात बाऱ्यावरील खोत व देवस्थानची नावे कमी करण्यासाठी पेढे परशुराम येथील ग्रामस्थांनी तिन ते चार वर्षे लढा दिला. अनेकदा मोर्चे काढून आंदोलने केली. मात्र ग्रामस्थांच्या पदरी निराशाच पडली. पेढे परशुराम वासीयांच्या तीव्र विरोधामुळे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम रखडले होते. महामार्गाच्या पुर्ततेसाठी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये घाटातील रूंदीकरणाच्या कामास सुरवात झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर झपाट्याने सुरू झालेले काम अखंड सुरू आहे.
-------------

साडेचार किमी लांबीचा घाट
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटानंतर मोठा आणि अवघट घाट म्हणून परशुराम घाटाची ओळख आहे. घाटाची एकूण लांबी ५.४० किमी आहे. या लांबीपैकी सुमारे ४.२० किमी लांबीतील काँक्रिटने चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. यामध्ये चिपळूणच्या हद्दीतील १८० मीटर कॉक्रिटीकरणाचे काम बाकी आहे. परशुराम घाटात खेडच्या हद्दीतील काम कल्याण टोलवेज कंपनीकडे असून हे काम सुरवातीस रेंगाळले होते. मात्र आता दिवसातील ५ तास घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आल्यानंतर कामास गती मिळाली आहे. उर्वरित लांबीपैकी १.२० किमी लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दऱ्या असल्याने चौपदरीकरणाचे काम करण्यास अवघड होत आहे. या लांबीपैकी डाव्या बाजूस सुमारे ६०० मीटर लांबीमध्ये दुहेरी लांबीतील काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झालेल्या भागावरुन वाहतूक सुरु झाली आहे. सुमारे ५०० मीटर लांबीत मातीकाम जवळजवळ पूर्ण करण्यात आला आहे. उर्वरित शंभर मीटर लांबीतील काम हे अवघड स्वरूपाचे आहे. या लांबीमध्ये सुमारे २५ मीटर उंचीपर्यंत डोंगराचे खोदकाम असल्याने या भागांमध्ये चार टप्प्यांमध्ये खोदकाम करण्यात येत असून त्यापैकी तीन टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाले आहे. १०० मीटरमधील चौथ्या टप्प्याचे काम हे अवघड स्वरूपाचे आहे. हे काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी घाटात दिवसातील ८ तास वाहतूक बंद ठेवून वेगाने रुंदीकरणाचे काम केले जात आहे.घाटामध्ये जेसीबी, डम्पर, रोलर, प्रेशर रोलर या माध्यमातून केलेल्या भरावावर प्रत्येक टप्प्यात काम सुरू आहे. त्यामुळे भराव दर्जेदार पद्धतीने केला जात आहे. मातीवर योग्य ते प्रेशर आणि व्हायब्रेटर रोलरने काम सुरू आहे.

घाटातील वाहतूक बंद काळात झपाटा
------------------------------
संरक्षक भिंतीलगत भरावाचे काम युद्धपातळीवर
सुमारे आठ फूट उंचीचा भराव पूर्ण होत आला
लवकरच घाटातील काँक्रिटीकरणाचे काम सुरू होईल
घाट रोज दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद
धोकादायक ९०० मीटरचे काम युद्धपातळीवर सुरू
जुन्या महामार्गावर भरावाचे काम जोरदारपणे सुरू
तीन दिवसांत सुमारे आठ फूट उंचीचा भराव केला
पावसाळ्यात एक लेन सुरू करण्याचे नियोजन
---------------

सुरेक्षासाठी घाटात दोन्ही बाजूला संरक्षक भिंत

घाटात चिपळूण हद्दीतील ईगल इन्फ्रा कंपनीमार्फत बहुतांशी काम पुर्ण झाले आहे. केवळ एमआयडीसीची पाईपलाईन बदलण्याचे व तेथील कॉक्रिटीकरणाचे काम शिल्लक आहे. शिवाय घाटात दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारणीचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनी मार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले आहे. येथे २२ मिटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठिण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला आहे. काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्याचे नियोजन आहे. परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव वसले आहे. घाटातील दरडी गावात कोसळू नयेत म्हणून घाटातील दोन्ही बाजूस संरक्षक भिंती उभारल्या जात आहेत. पावसाळ्याच्या कालावधीत दरडी कोसळू नयेत, यासाठी उतारावर स्टेपिंग करण्यात आले आहे. भराव खाली आल्यास सपाट जागेवर तो यावा, थेट रस्त्यावर भराव न येण्यासाठी काही ठिकाणी स्टेपिंग केले आहे.


पर्यायी चिरणी मार्गावरील डोकेदुखी
--
परशुराम घाट दिवसात पाच तास बंद
१२ ते ५ चिरणी लोटे पर्यायी वाहतूक
अरूंद रस्त्यावर जागोजागी वाहतूक कोंडी
वाहन धारकांसाठी पर्यायी मार्ग डोकेदुखी
मालवाहू गाड्या, कंपनी व स्कूल बसही
घाटात चोख पोलिस बंदोबस्ताचा अभाव
चिरणी घाटात तीव्र चढामुळे अवजड वाहनांची कोंडी
परिणामी ट्रॅफिक जाम होण्याचे प्रकार वारंवार
अर्ध्या तासाच्या प्रवासाला दीड तास लागतो
आवश्यक उपाययोजना राबविलेल्या नाहीत
-----

सुरक्षित घाट फोडण्याचे आव्हान

महामार्गावरील लांब आणि अवघड अशा परशुराम घाटात कातळ कमी आणि मुरूम व मातीचे प्रमाण जास्त आहे. डोंगर कटाईनंतर पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्याही दाट शक्यता होत्या. मात्र अपवाद वगळता यावर्षी सुदैवाने वारंवार दरडी कोसळलेल्या नाहीत. मात्र दोन वर्षापुर्वी घाटात डोंगर कटाईकरताना भराव जेसीबीवर आला होता. यात जेसीबी चालक अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तर डोंगर कटाई दरम्यान घाटीतल भला मोठा दगड पेढे येथील लोकवस्तीत येण्याची घटना घडली होती. या दगडाने एका घराला भगदाड पाडले होते. त्यामुळे वाहतूक सुरू असताना सुरक्षित घाट फोडण्याचे आव्हान होते. या घटना वगळता घाटत सुरक्षित डोंगर कटाई झाली आहे.धोकादायक परशुराम घाटातील एका अवघड वळणावर काळा दगड आहे. मात्र, तो फोडण्यास ठेकेदार कंपनीला सुरुंग लावण्यास विरोध होत आहे. नियंत्रित सुरूंगदेखील लावला जात नाही. त्यामुळे हा दगड फोडण्यासाठी घाटबंदीच्या काळात चोवीस तास ब्रेकर लावण्यात आला आहे. दिवस-रात्र हा दगड फोडण्यासाठी ब्रेकरची टकटक सुरू आहे. त्यामुळे पंधरा दिवसांत हा दगड बाजूला होण्याची शक्यता आहे.
---------------

ग्रामस्थांच्या मागण्याना वाटाण्याच्या अक्षता

परशुराम घाटात संरक्षक भिंत उभारण्याची मागणी गेल्या वर्षापासून सातत्याने झाली. मात्र भितींचे एक इंच देखील काम झालेले नाही. परशुराम थांबा येथे अंडरपासची मागणी असतानाही त्याची दखल घेतली नाही. त्यासाठी विविध उपाययोजनांकडे लक्ष वेधण्यासाठी परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम महिन्यापुर्वी बंद पाडले होते. परशुराम बस थांबा येथे अंडरपास बांधून सुरक्षा उपाय योजना कराव्यात. मौजे परशुराम येथील डोंगर पोखरल्याने डोंगरावरील घरांच्या सुरक्षेसाठी आरसीसी संरक्षक भिंत बांधणे. परशुराम व पेढे या गावांना जोडणारी मुख्य पायवाट (पाखाडी) जी पायवाट श्री देव परशुराम व श्री देव धावजी यांची पालखी नेण्यासाठी, शाळेतील मुले शाळेत जाण्यासाठी, शेतकरी शेतावर जाण्यासाठी व ग्रामस्थ चिपळूण येथे जाण्यासाठी वापरतात. या वाटेला फूटओव्हर ब्रिज तातडीने बांधणे. परशुराम बस थांबा येथे गावात येण्याजाण्यासाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करणे. या मागण्यांबाबत खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महामार्ग अधिकाऱ्यांशी १२ फेब्रुवारी २०२३ रोजी चर्चा झाली होती. त्यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही.

पेढेत अशी असेल गॅबियन वॉल

परशुराम घाटातील सतत कोसळणाऱ्या दरडी व त्यामुळे पेढे गावाला निर्माण झालेला धोका पाहता येथे काळ्या दगडाची मजबूत अशी भिंत उभारण्यात येत आहे. या भिंतीचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी ही भिंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून अहोरात्र काम करण्यात येत आहे. त्यामुळे या पावसाळ्यात पेढेवासीयांना दरडीपासून संरक्षण मिळणार आहे. संपूर्ण सर्वेक्षण करून व माती परीक्षण केल्यानंतर दरडीचा धोका टाळण्यासाठी व पेढे गावाला पूर्ण संरक्षण मिळावे म्हणून येथे संरक्षण भिंत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला व तातडीने भिंतीचे काम देखील सुरू करण्यात आले. येथील भिंतीला रासायनिक प्रक्रिया केलेली लोखंडी परंतु लवचिक व मजबूत अशा जाळीचे आवरण देखील देण्यात येत आहे. कदाचित दरड खाली आली आणि त्यामुळे भिंती फुटली तरी लोखंडी जाळी त्याला सहज थांबवू शकते परिणामी धोका कमी होईल अशा पद्धतीने रचना करण्यात आली आहे. तसेंच भिंतीच्या आतील बाजूने रासायनिक लेप असलेला मजबूत असा प्लास्टिक पेपर अंथरण्यात आला आहे. जो दरडीची माती भिंतीत जाऊ देणार नाही, अशा अत्याधुनिक भक्कम पद्धतीने भिंतीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

चौकट
पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीवर भर

परशुराम घाटात चिपळूण हद्दीतील चौपदरीकरणाचे मोठ्या प्रमाणात झालेले आहे. केवळ १८० मिटर कॉक्रिटीकरणाचे काम बाकी आहे. संरक्षक भिंतीचे कामही वेगाने सुरू असून लवकरच ते मार्गी लागेल. पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीवर आमचा भर राहील, असे शाखा अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्याम खवणेकर यांनी सांगितले. तर परशुराम घाटातील वाहतुक दिवसातील पाच तास बंद केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काम करण्यास चालना मिळाली. जुन्या रस्त्यावर वेगाने भराव करून त्वरित कॉक्रिटीकरण करण्याचे नियोजन आहे. मे महिन्यातील घाटातील खेड हद्दीतील महत्वाची कामे मार्गी लागतील असे अभियंता शिवाजी कांबळे यांनी सांगितले.


फोटो ओळी
- rat३०p१८.jpg-KOP२३L९९५८६ गायत्री जोगळे
कोट
चौपदरीकरणानंतर परशुरामवासीयांना विविध समस्याना सामोरे जावे लागते आहे. परशुराम थांबा येथे सातत्याने अंडरपासची मागणी करूनही त्याची दखल घेतलेली नाही. डोंगरावरील घरांसाठी सरंक्षण भिंतीला सुरवात नाही.
- गायत्री जोगळे, सरपंच - परशुराम

फोटो ओळी
- rat३०p१७.jpg-KOP२३L९९५८५ प्रवीण पाकळे
कोट
घाट बंद कालावधीत ठेकेदार कंपन्यांनी जास्तीत जास्त कामे मार्गी लावावीत. घाट बंदचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो. पावसाळ्या पुर्वी सरंक्षक भिंतीचे काम मार्गी लावावे. डोंगर खाली येउ नये,यासाठी वरती संरक्षक भिंती गरजेच्या आहेत. मात्र अद्यापही याकडे शासनाने लक्ष दिलेले नाही.
- प्रवीण पाकळे, माजी सरपंच, पेढे
----------
फोटो ओळी
- rat३०p२१.jpg- KOP२३L९९५८९ शौकत मुकादम
--------
कोट
पावसाळ्यात घाटात दरडी कोसळण्याचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे. पर्यायी चिरणी मार्गा पुरेपुर उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. पावसाळ्यापुर्वी घाटातील काम मार्गी न लागल्यास शालेय विद्यार्थ्याना मोठा फटका बसणार आहे. पर्यायी चिरणी रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झालेला नाही, तो झाला तर तो विकसित होइल.
- शौकत मुकादम, माजी सभापती व पर्यावरण प्रेमी
-----
फोटो ओळी
- rat३०p१९.jpg- KOP२३L९९५८७ जयदीप अनंत जोशी
कोट
परशुराम घाटातील कामे करताना ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रामुख्याने विचार करावा. पर्यायी मार्गाची व्यवस्था तातडीने करावी. घाटातील पालखीच्या मार्गावर फुट ओवर ब्रिज करावा. परशुराम देवस्थान मध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या दृष्टीने परशुराम थांबा येथे उपायोजना करायला हव्यात.
- जयदीप अनंत जोशी, सदस्य ग्रामपंचायत, परशुराम
----------
फोटो ओळी
- rat३०p२०.jpg-जयंतीलाल नानेचा
जयंतीलाल नानेचा
-----
कोट
परशुराम घाटात कंपनीकडे असलेली चौपदरीकरणाची बहुतांशी कामे मार्गी लागले आहेत. काँक्रीटीकरण चे केवळ १८० मीटरचे काम शिल्लक आहे. घाटातील दोन्ही बाजूस असलेल्या संरक्षण भिंतींचेही काम वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. पावसाळ्यात सुरक्षित वाहतूक सुरू राहील यावर आमचा भर आहे.
- जयंती लाल नानेचा, जनसंपर्क अधिकारी, ईगल इंफ्रा लिमटेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com