वेंगुर्लेत आज स्वच्छता मोहीम

वेंगुर्लेत आज स्वच्छता मोहीम

वेंगुर्लेत आज स्वच्छता मोहीम
वेंगुर्ले ः येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरणासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने या कार्याची सुरुवात उद्या (ता. १) होणार असून प्रारंभी तलाव सफाई व गाळ काढण्यात येणार आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत रामेश्वर मंदिर व परिसर सुशोभिकरण कार्यासाठी रुपये २ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. त्यापैकी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट, वेंगुर्ले नगरपरिषद, समस्त वेंगुर्लेकरवासीय व भक्तजन परिवार यांच्या लोकसहभागातून प्रारंभी श्री रामेश्वर तलाव सफाई व गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. वेंगुर्लेकरवासीयांनी या कामासाठी हातभार लावावा, असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
-------------------
रमाई नदी घेणार मोकळा श्वास
मालवण ः मसुरे येथील ग्रामस्थानी आमदार वैभव नाईक यांच्याकडे रमाई नदीतील गाळ काढण्याची मागणी केली होती. गेली ३० वर्षे हा गाळ काढण्याची येथील ग्रामस्थ प्रशासनाकडे मागणी करीत होते. आमदार नाईक यांनी याबाबत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीची तरतूद केली. गेल्या वर्षी या कामाला सुरुवात होऊन पहिल्या टप्प्यातील गाळ काढण्यात आला. आज नव्याने दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी मसुरे सरपंच संदीप हडकर, उपसरपंच नरेंद्र सावंत, छोटू ठाकुर, पिंट्या गावकर, जगदीश चव्हाण, रामराज सावंत, अशोक मसुरकर, रमेश पाताडे, साई बागवे, सत्यविजय भोगले, वैभव मसुरकर, विनायक चव्हाण, राघवेंद्र मुळीक, अमित बागवे, गोलतकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com