
हडी येथे आज रक्तदान शिबिर
हडी येथे आज रक्तदान शिबिर
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : हडी येथील मार्गेश्वर क्रीडा मंडळ आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान मालवण यांच्या वतीने उद्या (ता. १) सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. २ हडी-जठारवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात सहभागी होण्यासाठी संतोष आमरे, नागेश कावले, आर्या गावकर, शिल्पा खोत, रुपेश आमरे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री मांगेश्वर क्रीडा मंडळ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे श्रींची महापूजा, सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिर, दुपारी ३ ते ६ महिला व मुलांसाठी पारंपरिक खेळ, मंगळवारी (ता. २) सकाळी ९ वाजता श्रींची महापूजा प्रारंभ, दुपारी १२ वाजता तीर्थप्रसाद व महाप्रसाद, महिलासांठी हळदीकुंकू, सायंकाळी ६ ते ७.३० वाजता स्थानिक सुस्वर भजने, ७.३० ते ९.३० बुवा तारीणी विजय कवटकर (मुंबई) हिचे सुस्वर भजन, रात्री ९.३० ते १० वाजता मान्यवरांचे सन्मान, १०.३० वाजता श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचे ट्रिकसीनयुक्त ''अजिंक्यतारा भाग १'' हे दशावतारी नाटक होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.