चिपळूण-बहादूरशेखमधील कोंडीतून सुटकेसाठी पर्यायी मार्गाचा वापर

चिपळूण-बहादूरशेखमधील कोंडीतून सुटकेसाठी पर्यायी मार्गाचा वापर

फोटो ओळी
-rat30p43.jpg-KOP23L99644 चिपळूण : बहादूरशेख नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी.


बहादूरशेख नाका कोंडीतून
सुटकेसाठी पर्यायी मार्गाचा वापर
चिपळूण, ता. 30 ः उन्हाळी सुट्या सुरू झाल्याने बहादूरशेख नाक्यावर येणाऱ्या चारचाकी वाहनांची संख्या वाढली आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. वाहतुक कोंडीत अडकू नये म्हणून वाहन चालक पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत.

परशुराम घाट रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून चिरणी-आंबडस रोडचा वापर सुरू झाला आहे. मात्र कळंबस्ते येथून चिपळूणच्या दिशेने येणारे वाहन चालक बहादूरशेख नाक्यावर आल्यानंतर कावीळतळीमार्गे चिपळूण शहरात येत होते. त्यांना शहरात प्रवेश करण्यासाठी फरशीतिठा येथूनही मार्ग आहे. मात्र हा मार्ग अरुंद आहे. त्यामुळे वाहनचालक बहादूरशेख नाक्यावर आल्यानंतर काविळतळीमार्गे शहरात येते होते. आता मात्र बहादूरशेख नाक्यावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक बेजार झाले आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी आता फरशीतिठा येथून शहरात प्रवेश करण्यास सुरवात केली आहे.
बहादूरशेख नाक्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी सावर्डेकडे जाणारे नागरिक सुद्धा आता गुहागर बायपास मार्गाचा वापर करीत आहेत. ते फरशीतिठामार्गे शहरात येतात आणि गुहागर बायपासमार्गे महामार्गावर येतात. चिपळूण शहरातून पोफळीकडे जाणारे वाहन चालक आता गुरूकुल कॉलेज येथून रावतळे भागात प्रवेश करतात आणि बहादूरशेख नाका येथील मच्छीमार्केटच्या मागील बाजूने बाहेर पडतात. हा रस्ता पोफळीकडे जाणाऱ्या लोकांसाठी सोयीचा आहे. गुरुकुल कॉलेजच्या समोर रस्त्याचे काम सुरू आहे. येथे एकेरी मार्ग सुरू आहे. त्यामुळे गुरूकुल कॉलेजकडे जाण्यासाठी वाहन चालकांना कसरत करावी लागते. एकेरी मार्गावरून पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जावे लागते. वालोपे येथून पोफळीकडे जाणारे नागरिक कळंबस्ते फाट्यावरून प्रवेश करतात. चिरणी फाट्यावरून मोरवणेकडे जातात. तेथून वालोटीमध्ये येतात त्यानंतर खडपोली-पिंपळीमार्गे ते पोफळीकडे जातात. बहादूरशेख नाक्यावरील काम चालू असेपर्यंत ही वाहतूक कोंडी सुरू आहे. त्यामुळे वाहन चालकांचा त्रास सहन करावा लागत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com