
गुणवंत कामगार पुरस्कारांचे कुडाळ येथे आज वितरण
गुणवंत कामगार पुरस्कारांचे
कुडाळ येथे आज वितरण
कुडाळ, ता. ३० ः महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून येथील एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनच्यावतीने यावर्षीपासून गुणवंत कामगार पुरस्कार देण्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर करण्यात आले.
असोसिएशनने डॉ. नितीन पावसकर, राजन नाईक व हरिश्चंद्र वेंगुर्लेकर या त्रिसदस्यीय निवड समितीमार्फत येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांकडून प्राप्त झालेल्या नामांकनातून २०२३ च्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी कामगारांची निवड केली. यात संतोष गावडे (सुमो कंटेनर्स), अनिल मिश्रा (विराज प्लास्टिक), महेश राणे (चिवार सेवा), सुनील धुरी (सुमो कंटेनर्स), सतीश हळदणकर (कॉनबॅक), आना नाईक (लक्ष्मी इंडस्ट्रीज), महेश गावडे (सुप्रिम फिडस्), एकनाथ गवंडी (जान्स बांबू प्रॉडक्स प्रा. लि.), स्मिता नाईक-परब (नेटीव्ह कॉनबॅक बांबू प्रॉडक्स प्रा. लि.) यांचा समावेश आहे. उद्या (ता. १) सकाळी ८ वाजता येथील असोसिएशन संकुल, एमआयडीसी येथे झेंडा वंदन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. यावेळी मर्चंट नेव्हीचे मरीन इंजिनिअर प्रशांत सावळ, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे वरिष्ठ अधिकारी तथा माजी सैनिक नामदेव सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. सर्व उद्योजक, कामगार व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर यांनी केले आहे.